अतिरेक्यांना मदत करणाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

श्रीनगर : पहलगाममध्ये हल्ला करुन २६ नागरिकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना अन्न, पाणी आदी स्वरुपाची मदत करणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.



सुरक्षा पथकाला अतिरेक्यांच्या मदतनिसाविषयी ठोस माहिती मिळताच कारवाई सुरू केली. अटकेची जाणीव होताच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पळायला सुरुवात केली. घनदाट जंगलातून सुरक्षा पथकांना चकवण्याचा प्रयत्न त्याने केला. पण सुरक्षा पथकाचे जवान त्याला पकडण्यासाठी पाठलाग करत होते. अखेर पळणे कठीण आहे असे जाणवू लागताच जवळून वाहणाऱ्या नदीत उडी टाकून तरुणाने सुरक्षित अंतर गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नदीमार्गे पळण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला. सुरक्षा पथकाने नदीच्या प्रवाहातून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

जम्मू काश्मीरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण घनदाट जंगलातून पळत नदीत उडी मारताना दिसत आहे. याच तरुणाने अतिरेक्यांना मदत केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. मृत तरुणाचे नाव इम्तियाज अहमद मगरे असे आहे. तो २३ वर्षांचा होता. इम्तियाज कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग येथील राहणारा होता. पैशांसाठी तंगमार्ग येथील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना जेवणं आणि निवारा दिला होता.

नवा वाद भडकला

सुरक्षा पथक इम्तियाज नदीत बुडून मेल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात इम्तियाजला सुरक्षा पथकाने अटक केली होती. नंतर चौकशी झाल्यावर त्याला पाण्यात बुडवून मारण्यात आले; असा आरोप पॉप्युलर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी केला.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा