इस्रायलचा गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ला; ६० पेक्षा अधिक नागरिक मृत, २२ बालकांचा दुर्दैवी अंत

इस्रायल : गाझा पट्टी पुन्हा एकदा रणभूमी झाली आहे. इस्रायलने शनिवारी (१० मे) गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात किमान ६० नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. जबालिया भागात झालेल्या हल्ल्यात इंडोनेशियन स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात हानी झाली असून अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.


या हल्ल्याआधी शुक्रवारी रात्री इस्रायली हवाई दलाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्नसाठा असलेल्या इमारतीवरही हल्ला केला होता. गाझामधील मदतीच्या हालचालींवर इस्रायलने कडक नाकेबंदी लागू केल्यामुळे हजारो नागरिक अन्न-पाण्याविना अडचणीत आले आहेत. अनेक मदत केंद्रे बंद करण्यात आली असून परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.



इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, "गाझामधील युद्ध थांबवण्याचा विचारही करता येणार नाही." त्यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायल-हमास यांच्यातील शस्त्रसंधीची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने या हल्ल्यांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


युद्धाच्या या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे तणाव वाढतोय, तर रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. अशा तिहेरी संघर्षाच्या छायेत जग पुन्हा एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे.


मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या कारवायांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. गाझाला अन्न व औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे ही उपासमारीची शस्त्रनीती असल्याचं सांगत या कृतीला युद्ध गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनीही इस्रायलच्या कारवायांवर आक्षेप घेतला आहे.


दरम्यान, इस्रायलचा दावा आहे की हे सर्व हल्ले हमासवर दबाव टाकण्यासाठी करण्यात येत आहेत, जेणेकरून ते ओलिसांची सुटका करतील आणि शस्त्र सोडतील. पण प्रश्न असा आहे की, या युद्धाच्या पेटलेल्या भट्टीत निरपराध नागरिकांचे बळी कधीपर्यंत जात राहणार?

Comments
Add Comment

Nvidia मध्ये मोठी उलथापालथ; गंभीर वादानंतर जेनसन हुआंग यांनी सोडले सीईओ पद

एनविडियाचे सहसंस्थापक जेनसन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक मंडळ

ॲपलनंतर आता एनव्हिडियाची धुरा सांभाळणार टिम कुक? जेन्सन हुआंग यांच्या जागी नावाची जोरदार चर्चा!

जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली एनव्हिडीया कंपनीचे सीईओ सध्या जोरदार चर्चेत आहेत. कथित विवाहबाह्य संबंधांमुळे

New Year In Dubai: बुर्ज खलिफाजवळ हॉटेल रूमचे दर गगनाला भिडले; नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी!

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं. काही जण कुटुंबासोबत तर काही जण

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा विशेष सन्मान; न्यूयॉर्कमधील 'व्हेटरन्स डे' परेडच्या ग्रँड मार्शल म्हणून नेतृत्व

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना अमेरिकेतील 'व्हेटरन्स डे' परेडमध्ये 'ग्रँड

ब्रुकलिनमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 2 ठार, 17 जखमी, एकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना

फारसच्या आखातात दुबईकडे जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशासह चौघे गंभीर जखमी!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद