Nvidia मध्ये मोठी उलथापालथ; गंभीर वादानंतर जेनसन हुआंग यांनी सोडले सीईओ पद

एनविडियाच्या सीईओ गेल्या काही दिवसांपासून एका वादात अडकले होते. चिनी गुप्तहेरासोबत कथित संबंधामुळे चर्चेत आले होते. त्यामुळे सीईओ पदावरून राजीनामा देण्याचा दबाव होता. अखेर जेनसन हुआंग यांनी पद सोडले आहे.

एनविडियाचे सहसंस्थापक जेनसन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक मंडळ सदस्य या पदांवरून पायउतार झाले आहेत.जेनसन हुआंग यांनी गेल्या 33 वर्षांपासून कंपनीचे नेतृत्व केले होते. पण कथित चिनी गुप्तहेराच्या वादात अडकल्यानंतर हुआंग यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या निकटवर्ती असलेल्या महिलेवर चीनसाठी हेरगिरी केल्याचा अमेरिकी अधिकाऱ्यांना संशय होता. कंपनीने 12 नोव्हेंबर रोजी ही अधिकृत घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) कोलेटी क्रेस यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जेनसन हुआंग यांनी 1993 मध्ये एनविडियाची सहस्थापना केली होती. तेव्हापासून त्यांनी या कंपनीचं नेतृत्व केलं होतं. पण आता त्यांना हे पद सोडावं लागलं आहे. दुसरीकडे, कंपनीने कायमस्वरूपी सीईओ शोधाला सुरुवात केली आहे.



एनविडियाच्या संचालक मंडळाने मानले योगदानाबद्दल आभार


मीडिया रिपोर्टनुसार, हुआंग यांचे त्यांच्याच कंपनीतील एका महिला अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. पण सदर महिला चिनी गुप्तहेर असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली. या खुलाशानंतर टेक विश्वात खळबळ उडाली होती. तसेच जेनसन हुआंग यांच्यावर पद सोडण्याचा दबाव वाढला होता. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जेन्सन हुआंग हे एनविडियाचे सह-संस्थापक असून कंपनीमध्ये त्यांचा 3.61% हिस्सा असून चौथे सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. एनविडियामधून जेनसन यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने म्हटले की, हुआंग यांचे कंपनी आणि तंत्रज्ञान उद्योगातील योगदान महत्त्वपूर्ण आणि लक्षणीय आहे. एनविडिया ही आज जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे आणि याचे श्रेय काही अंशी हुआंग यांच्या योगदानाला जाते.त्याबद्दल कंपनी सदैव कृतज्ञ राहील.



नेतृत्व बदलाचा एनविडियाला मोठा फटका


इतकंच काय गुरूवारी एनविडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायलामिळाली. प्री मार्केट ट्रेडिंगमध्ये एनविडियाचे शेअर्स 11 टक्क्यांहून अधिक घसरले होते. त्यामुळे या महिन्यात कंपनीच्या बाजारमूल्यात अंदाजे 1 ट्रिलियन डॉलर्सची घट होण्याची शक्यता आहे. एनविडियाच्या नेतृत्व बदलामुळे गुंतवणूकदारांना भविष्यात कंपनीच्या एआय व्यवसायाच्या टिकाऊपणाबाबत अनिश्चितता वाटत आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स धडाधड पडले.

Comments
Add Comment

ॲपलनंतर आता एनव्हिडियाची धुरा सांभाळणार टिम कुक? जेन्सन हुआंग यांच्या जागी नावाची जोरदार चर्चा!

जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली एनव्हिडीया कंपनीचे सीईओ सध्या जोरदार चर्चेत आहेत. कथित विवाहबाह्य संबंधांमुळे

New Year In Dubai: बुर्ज खलिफाजवळ हॉटेल रूमचे दर गगनाला भिडले; नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी!

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं. काही जण कुटुंबासोबत तर काही जण

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा विशेष सन्मान; न्यूयॉर्कमधील 'व्हेटरन्स डे' परेडच्या ग्रँड मार्शल म्हणून नेतृत्व

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना अमेरिकेतील 'व्हेटरन्स डे' परेडमध्ये 'ग्रँड

ब्रुकलिनमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 2 ठार, 17 जखमी, एकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना

फारसच्या आखातात दुबईकडे जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशासह चौघे गंभीर जखमी!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद

रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळणार? अबू धाबीतील गुप्त त्रिपक्षीय चर्चेने उडाली खळबळ

अबू धाबी: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केंद्रित झाले असून, गेल्या चार वर्षांपासून जगाला