Metro : संपूर्ण मुंबईभोवती वर्षभरात मेट्रोचं जाळं

देशाची आर्थिक राजधानी मुंबईला अत्याधुनिक सार्वजनिक वाहतुकीच्या जाळ्याने जोडण्यासाठी सरकारचं प्रयत्न वेगानं सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून महामुंबईत एकूण १४६ किमी मेट्रोमार्गिकांचं जाळं विणलं जातय. त्यातील ५० किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका २०२५ च्या अखेरीला सुरू होतील. त्यामुळं थंडगार एसीतून गारेगार प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.



दृष्टिक्षेपात मेट्रो कोणत्या आहेत हे पुढीलप्रमाणे



  • पाच मेट्रो मार्गिका सुरू होण्याची तयारी

  • भूमिगत मार्गिका वरळीहून दक्षिण टोकापर्यंत येणार

  • दहिसर-भाईदर, चेंबूर-मंडाळे, ठाण्यातही जोडणी

  • ५० किलोमीटर मार्गिका प्रवासीसेवेत येणार आहे


देशातील सर्वाधिक लांबीची भूमिगत मार्गिका पाहूया


दक्षिण टोकाकडील भूमिगत मार्गिका लवकरचं पूर्ण होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसी) ही मेट्रो उभी राहतेय. मेट्रो ३ ही ३३ किलोमीटरची देशातील सर्वाधिक लांबीची व राज्यातील १०० टक्के भूमिगत मार्गिका आहे. या मार्गिकेचा १३ किलोमीटर लांबीचा 'आरे जेव्हीएलआर ते बीकेसी' हा टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाला.



ठाणे-मुंबई जोडणारे 'मेट्रो ४' व '४ अ'


ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील रहिवाशांसाठी ठाणे स्थानक लांब अंतरावर आहे. त्यामुळं घोडबंदर रस्त्याला थेट वडाळ्याशी जोडण्यासाठी 'मेट्रो ४ अ' व 'मेट्रो ४' ही संयुक्त उन्नत मार्गिका साकारली जातेय. यापैकी 'मेट्रो ४' मार्गिकचा पहिला टप्पा आठ स्थानके व १० किलोमीटरचा असेल. यात कासारवडवली, विजय गार्डन, डोगरीपाडा, टिकुजी नी वाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजीवाडा व कॅडबरी जंक्शन या स्थानकांचा समावेश असेल. याच मार्गिकला जोडून गायमुख ते कासारवडवली ही दोन स्थानकांची व ३ किलोमीटर लांबीची 'मेट्रो ४ अ' ही उन्नत मार्गिका उभी होत आहे. या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्थानक उभारणी व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे



उत्तरेकडे मेट्रो ९ लवकरच सज्ज


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सन २०२२ व २०२३ मध्ये दोन टप्प्यांत गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर, अशा दोन टप्प्यांत दोन मेट्रो मार्गिका सुरू केल्या. या मार्गिकांना दहिसर येथून मिरा-भाईंदरशी जोडणी देण्यासाठी 'मेट्रो ५' ही उन्नत मार्गिका उभी होत आहे. या मार्गिकतील दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव व काशिगाव, हा चार स्थानकांचा टप्पा या वर्षअखेरपर्यंत प्रवासीसेवेसाठी सुरू होत आहे. या टप्प्यासाठीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. स्थानक उभारणी व रूळ टाकण्याची कामे सुरू आहेत. विद्युतीकरणाचे काम अलीकडेच सुरू झाले.



पूर्वेकडे पोहोचणारी 'मेट्रो २ ब'


मुंबईच्या पश्चिम उपनगरांना मध्यनगरांमागें जोडून थेट पूर्वेच्या खाडीपर्यंत जाणारी 'मेट्रो २ च' ही उन्नत मार्गिका एमएमआरडीए उभी करीत आहे. ईएसआयसीनगर (अंधेरी पश्चिम) ते मंडाळे मार्गे वांद्रे-कुर्ला अशी ही मार्गिका आहे. या मार्गिकेतील मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक ते डायमंड गार्डन, चेंबूर या पाच स्थानकांच्या टप्प्यासाठी गाडीची चाचणी अलीकडेच झाली, त्यानंतर याचवर्षी मार्गिकया पाच स्थानकांचा व सहा किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

Wedding Muhurat November 2026: तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईसाठी नोव्हेंबरमध्ये फक्त 4 शुभ मुहूर्त!

Wedding Muhurat November 2026: नुकताच दिवाळी हा सण पार पडला. दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. देवउठनी एकादशी आणि तुळशी

ठाणे गावदेवी मार्केट आग दुर्घटना; सागर शिंदेंच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला 21 मे 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या

Maatrubhumi: सलमानच्या 'मातृभूमी'मधील 5 संवाद प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झाले

Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये

Devendra Fadanvis: कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके विकसित करा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

नागपूर: रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन,

Thane Railway Station: ठाणेकरांचा रेल्वे प्रवास होणार सोपा! फलाट 5-6 वर नवा एस्केलेटर, फलाट 2 वर मोफत स्वच्छतागृह

Thane Railway Station: मध्य रेल्वेचे ठाणे हे प्रमुख आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. ठाण्यावरून पनवेल, सीएसएमटी, कर्जत,

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा