आज रेपो दर थोड्याच वेळात आरबीआय जाहीर करणार 'ही ' आहे जागतिक पार्श्वभूमी.....

प्रतिनिधी: आज आरबीआयच्या निर्णयाचे वेध लागल्याने बाजारात आज सावध सुरुवात झाली आहे. काल अमेरिकन बाजारात पडझड झाल्यानंतर आज गुंतवणूकदार औत्सुक्याने बाजार हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. काल सेन्सेक्स ४४३ व निफ्टी १९७ अंशाने वाढल्यानंतर आज बाजार विशेषतः निफ्टी २५१०० पातळी पार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आज ४ ते ६ जून या दोन दिवशी आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली होती. आज आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यासंबंधीची माहिती आज प्रसारमाध्यमांना देणार आहे. बहुतेक तज्ञांच्या मते आज रेपो दरात २५ बीपीएस पूर्णांकांने कपात होऊ शकते असे झाल्यास बाजारातील भावना या सकारात्मक होऊ शकतात. सलग दोनवेळा आरबीआयने रेपो दरात कपात केली होती आता ६ टक्क्यांत परिणती किती दरावर पोहोचेल हे थोड्या वेळात कळेलच.


रेपो रेट हा व्याजदर आहे जो बँकांनी सरकारी रोख्यांवर कर्ज घेतल्यावर आरबीआयला द्यावा लागतो. म्हणून जेव्हा बँका स्वस्त व्याजदराने कर्ज मिळवतात.एसबीआय रिसर्चच्या अहवालात ५० बेसिस पॉइंट्सची जास्त दर कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


भारताचा आर्थिक वर्ष २०२४ -२५ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढ ७.४ टक्क्यांपर्यंत वाढली. संपूर्ण वर्षासाठी अंदाजानुसार, वाढ ६.५ टक्के होती. दरम्यान, एप्रिल २०२५ मध्ये महागाई ३.१६ टक्क्यांपर्यंत कमी झाली, जी जुलै २०१९ नंतरची महागाईची सर्वात कमी पातळी आहे. मात्र मागील वर्षातील तिमाहीप्रमाणे जीडीपी दरवाढ २५-२५ चौथ्या तिमाहीत झाली नसली तरी जगभरातील महागाईपेक्षा भारतातील महागाई कमी राहिल्याने तसेच उत्पादनची वाढती मागणी व पुरवठा पाहता बाजारात चढा कल कायम राहू शकतो.


याशिवाय भारत व युरोपीय युनियन यांच्यात फ्री ट्रेड संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिल्याने आता युरोप अमेरिका व्यापार संबंध व भारत अमेरिका व भारत युरोप यांच्या व्यापारी धोरणावर संगनमत झाल्यास शेअर बाजारात सकारात्मक चित्र दिसू शकते.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''