Thursday, October 15, 2026

Accident News: वर्सोवा खाडीत तेलाचा टँकर कोसळला, चालकाचा बुडून मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुलाची संरक्षक भिंत तोडून भीषण अपघात

भाईंदर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जाणारा तेलाचा टँकर काशिमिरा जवळील वर्सोवा खाडीवरील पुलाची संरक्षक भिंत तोडून खाली पाण्यात कोसळल्यामुळे टँकर चालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली आहे.

मुंबईवरून निघालेला तेलाचा टँकर अहमदाबादच्या दिशेने जात असताना काशिमिरा भागातील वरसोवा खाडीवरील पुलाची संरक्षक भिंतीला धडक देऊन थेट पाण्यात कोसळला. या दुर्घटनेत टँकर चालकाचा बुडून मृत्यू झाला असून पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने तो टँकर बाहेर काढला आहे. चालकाव्यतिरिक्त टँकरमध्ये अन्य कोण होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत. बुडून मृत्यू झालेल्या चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >