Stock Market Update: बाजारात घबराट गिफ्ट निफ्टी २०० अंकांने घसरल्यानंतर सेन्सेक्स निफ्टीत 'इतक्याने' घसरण पूर्ण अपडेट जाणून घ्या....

प्रतिनिधी: इस्त्राईल व इराणच्या तुंबळ युद्धात शेअर बाजारात मोठे नुकसान झाले आहे. ते इतके की सकाळी प्री - ओपन सत्रापर्यंत गिफ्ट निफ्टी २०० अंकाने घसरल्याने बाजारात घबराट पसरली आहे. सकाळी सत्र सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) हा ७१३.४३ अंकांने घसरत ८१६६९४.३१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात १७२.६५ अंकाने घसरत २४९३९.७५ पातळीवर पोहोचला आहे. मात्र मार्केट तज्ञांनी नोंदवलेल्या निरिक्षणानुसार भारताचे फंडामेंटल सध्या मजबूत स्थितीत असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत होणारे भारतात मात्र नुकसान कमी करणार आहे. आरबीआयच्या तरलता वाढवण्याच्या धोरणामुळे बाजारात सकारात्मकता असल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांना मत नोंदवले होते. पुट व कॉल यामधील गुणोत्तर वाढू शकते मात्र दुसरीकडे वीआयएक्स (Volatility Index VIX) हा धोक्याच्या पातळीपेक्षा आटोक्यात राहू शकतो असे तज्ञांनी म्हटले होते.


आज सकाळच्या सत्रात सुरूवातीलाच सेन्सेक्स बँक निर्देशांक ४४१.८३ अंकाने घसरत ६२९७०.३६ पातळीवर गेला तर बँक निफ्टी निर्देशांकात २६५.८० अंकाने घसरण होत ५५९८७.०५ पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.४७%,०.३५% घसरण झाली. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.२२%, ०.०८% घसरण झाली आहे.


विशेषतः आज वीआयएक्स (Indian Volatility Index VIX अस्थिरता निर्देशांक) हा ४.५५% वाढल्याने प्रामुख्याने अस्थिरतेचे वातावरण कायम राहिले आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) बाबतीत म्हणायचे झाले तर मिडिया (०.२६%) समभाग वगळता इतर सर्व निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी (१.१२%), एफएमसीजी (०.८१%), पीएसयु बँक (०.३४%), रिअल्टी (०.४२%), ऑटो (०.८५%), तेल व गॅस (०.४६%) समभागात झाली आहे.


जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या जागतिक निर्देशांकात तर १ ते २% वाढ होत असल्याने क्रूड तेल महागले आहे. याशिवाय मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम म्हणून एफएमसीजी (Fast Moving Consumer Goods FMCG) वस्तूंच्या सप्लाय चेनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वस्तूंच्या किंमती वाढू शकतात असा कयास आहे. एकंदरीत सकाळची परिस्थिती पाहता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आज किती जोखीम भारतीय बाजारात घेतात यावर नवी रूपरेषा अवलंबून असेल याशिवाय आज विशेषतः मिडकॅप व लार्जकॅप मध्ये अधिक चढउतार पहायला मिळत आहे कारण तुलनेने स्मॉलकॅपमध्ये सकाळी कमी घसरण झाली. या व्यतिरिक्त, अमेरिकेने इराणमधील तीन अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यानंतर सोमवारी आशिया-पॅसिफिक बाजार कोसळले आहे . अंतिमतः तेलाच्या किमती वाढल्या आणि मध्य पूर्व संघर्षात वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहेत.


आज सकाळ सत्रात एससीआय (४.५८%), अलकाईल (३.५%), डेटा पॅटर्न (३.२३%), ईलजी इक्विपमेंट (Elgi Equipments) (३.०९%), गार्डन रिच (२.८४%), कोचीन शिपयार्ड (२.४५%), ईक्लर्क सर्विसेस (२.४१%), माझगाव डॉक(२.१५ %), रामकृष्ण फोर्ज (२.१४%), भारत डायनॅमिक (२.०५%), इंद्रप्रस्थ गॅस (१.५३%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (०.८६%),अदानी पॉवर ( १.५०%), होंडाई मोटर्स इंडिया (०.७८%), नेस्ले इंडिया (०.६१%) अदानी एनर्जी सोल्यूशन (०.३९%) सम भागात वाढ झाली आहे.


तर सर्वाधिक घसरण ओला इलेक्ट्रिक (४.३२%), अस्ट्राल (४.२४%), बीईएमएल (३.९९%), अतुल (३.९६%), ३६९ वन (३.८८%), सुप्रिम इंडस्ट्रीज (३.४%), सिमेन्स (२.२४%), कल्याण ज्वेलर्स (१.९१%), एनटीपीसी ग्रीन (१.८६%), श्रीराम फायनान्स (१.८५%), स्विगी (१.७२%), मेट्रोपोलिस हेल्थकेअर (१.६९%),मदर्सन (१.७७%), इन्फोसिस (२.३४%), ब्रिटानिया (१.९२%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.५५%), जिओ फायनांशियल सर्विसेस (१.४८%), टीसीएस (१.४१%), रिलायन्स (१.३७%), जेएसडब्लू स्टील (१.३०%), बजाज फिनसर्व्ह (१.२२%) या समभागात झाली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.