मुंबईतील उद्योजकाने राम मंदिरासाठी केले १७५ किलो सोने अर्पण
June 24, 2025 10:03 PM
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. रामललासह श्रीरामांच्या भव्य राम दरबाराचे दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. सन २०२५ च्या अखेरपर्यंत राम मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच मुंबईतील एका बड्या उद्योजकाने राम मंदिरासाठी तब्बल १७५ किलो सोने अर्पण केले आहे. परंतु, हे गुप्त दान केले असून, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. उद्योजकाने दान केलेले सोने राम मंदिराच्या शिखर-कलशापासून ते दरवाजे आणि दाराच्या चौकटीपर्यंत वापरले गेले आहे.