Edelweiss NCD: गुंतवणूकीसाठी आणखी एक संधी! एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ३,००० दशलक्ष NCD ची घोषणा

ठळक मुद्दे -


दरवर्षी १०.५०% पर्यंत प्रभावी उत्पन्न


क्रेडिट रेटिंग (Credit Ratings): क्रिसिल ए+/ क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेड द्वारे स्थिर


केवळ डीमटेरियलाइज्ड (Dematerilised) स्वरूपात व्यापार


बीएसई लिमिटेडशी सल्लामसलत करून, बीएसई लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक बुकमध्ये अर्ज अपलोड केल्याच्या तारखेच्या आधारावर वाटप केले जाईल. तथापि, ओव्हरसबस्क्रिप्शनच्या तारखेला आणि त्यानंतर अर्जदारांना प्रमाणानुसार वाटप 


मुंबई: एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (Edelweiss Financial Servics Limited) ने आज १,००० रूपयांच्या दर्शनी मूल्याच्या (Face Value) सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स प्रकारच्या सार्वजनिक इश्यूची (Public Issues) घोषणा केली ज्याची रक्कम १,५०० दशलक्ष (Base Issue Price) पर्यंत आहे. एनसीडीत १,५०० दशलक्ष पर्यंतचा ग्रीन शू पर्याय (Gree Shoe Option) आहे, जो एकत्रितपणे ३,००० दशलक्षपर्यंत मर्यादित आहे.या एकूण इश्यूमध्ये १२ मालिका एनसीडी आहेत ज्यांचे मुदत निश्चित कूपन (Fixed Coupon) आहे. त्यांचा एकूण कालावधी २४ महिने, ३६ महिने, ६० महिने आणि १२० महिने आहे आणि त्यांचा कालावधी वार्षिक, मासिक आणि संचयी व्याज पर्यायां सह (Cumulative Interest Options) आहे. एनसीडीवरील प्रभावी वार्षिक व्याज उत्पन्न ९.००% प्रति वर्षापासून आहे. तर १०.४९% पर्यंत वार्षिक व्याजदर असेल.हा इश्यू मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी उघडणार आहे आणि सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी बंद होणार आहे.


या इश्यूद्वारे उभारलेल्या निधीपैकी किमान ७५% निधी कंपनीच्या विद्यमान कर्जांच्या व्याज आणि मुद्दलाच्या परतफेडी/पूर्वभरणीसाठी वापरला जाईल आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे, जो इश्यू मध्ये उभारलेल्या रकमेच्या २५% पेक्षा जास्त नसावा, जो वेळोवेळी सुधारित केलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू अँड लिस्टिंग ऑफ नॉन-कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज) नियमावली, २०२१ सेबी एनसीएस नियमावलीनुसार असेल. या इश्यूअंतर्गत जारी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या एनसीडींना 'क्रिसिल ए+/स्टेबल' (स्थिर दृष्टिकोनासह 'क्रिसिल ए प्लस रेटिंग') हे रेटिंग देण्यात आले आहे. ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अँडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि टिप्सन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे लीड मॅनेजर आहेत. गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करण्यासाठी एनसीडी बीएसई लिमिटेडवर सूचीबद्ध (Listed) केल्या जातील.


सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (मर्चंट बँकर्स) रेग्युलेशन, १९९२, सुधारित (मर्चंट बँकर्स रेग्युलेशन) नुसार, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीची सहयोगी मानली जाते. शिवाय, नियम २१अ च्या तरतुदी आणि मर्चंट बँकर्स रेग्युलेशनच्या नियम २१ अ स्पष्टीकरणाचे पालन करून नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड केवळ इश्यूच्या मार्केटिंगमध्ये आणि सेबी एनसीएस रेग्युलेशनच्या नियम २५(३) नुसार सहभागी असेल आणि ड्यू डिलिजेंस सर्टिफिकेट जारी करणार नाही असे कंपनीने आपल्या माहितीत म्हटले आहे.


एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीलबद्दल -


एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (EFSL) २१ ही कंपनी नोव्हेंबर १९९५ रोजी एडेलवाईस कॅपिटल लिमिटेड या नावाने स्थापन करण्यात आली आणि सेबीकडून कॅटेगरी II परवाना मिळाल्यानंतर गुंतवणूक बँकिंग फर्म म्हणून काम सुरू केले. त्यानंतर एडेलवाईस कॅपिटल लिमिटेडला १६ ऑक्टोबर २००० पासून सेबीकडून कॅटेगरी I मर्चंट बँकर परवाना मिळाला. १ ऑगस्ट २०११ पासून एडेलवाईस कॅपिटल लिमिटेडचे नाव बदलून ‘एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ असे करण्यात आले.


EFSL चे इक्विटी शेअर्स डिसेंबर २००७ मध्ये बीएसई (BSE) लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर NSE: EDELWEISS, BSE: 532922, Reuters: EDEL.NS आणि EDEL.BO आणि ब्लूमबर्ग: EDEL IS आणि EDEL IB या चिन्हांखाली सूचीबद्ध करण्यात आले. EFSL चा कॉर्पोरेट ओळख क्रमांक L99999MH1995PLC094641 आहे.


गुंतवणूक बँकिंग फर्म म्हणून व्यवसाय सुरू केल्यानंतर, कंपनीच्या उपकंपन्यांनी (Subsidiary) त्यांचे व्यवसाय रिटेल आणि कॉर्पोरेट क्रेडिट, म्युच्युअल फंड, पर्यायी मालमत्ता व्यवस्थापन, मालमत्ता पुनर्बांधणी, जीवन विमा आणि सामान्य विमा व्यवसायांमध्ये विविधीकृत (Diversification) केले आहेत.


कंपनीने म्हटले आहे की,' उत्पादन नवोपक्रम आणि निर्बाध ग्राहक अनुभवावर आमचे लक्ष केंद्रित केल्याने आमचा रिटेल व्यवसाय अंदाजे ~९.७३ दशलक्ष ग्राहकांपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे असे आम्हाला वाटते. आमच्या संशोधन आ धारित दृष्टिकोनामुळे आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील ट्रेंडचा फायदा घेण्याची सातत्यपूर्ण क्षमता यामुळे आम्हाला कॉर्पोरेट्स, संस्था (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही), उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्ती आणि किरकोळ ग्राहकांसह क्लायंट विभागांमध्ये मजबूत संबंध निर्माण करण्यास सक्षम केले आहे. आमचे संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे ज्यामध्ये २५२ देशांतर्गत कार्यालये आणि ३ आंतरराष्ट्रीय कार्यालये (एकूण २५५ कार्यालये) आहेत आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत ५,६१२ कर्मचारी कार्यरत होते' असे एनसीडी उपलब्ध करून देताना कंपनीने लाँच दरम्यान म्हटले आहे.

Comments
Add Comment

एकदाच पैसे भरा अन् आयुष्यभर खिशात खुळखुळणार पैसा! LIC ची ही भन्नाट योजना ठरतेय गेम चेंजर

LIC Pension : आयुष्यभरात केलेल्या कष्टाच्या कमाईनंतर म्हातारपणी आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये,

Airtel Buy 1 Get 1 Recharge Offer: एअरटेलची धमाकेदार ऑफर! ₹349 आणि ₹399 च्या रिचार्जवर मिळणार 1 रिचार्ज फ्री; 56 दिवसांची वैधता

एअरटेल ब्रॉडबँड नेटवर्कने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी निवडक प्रीपेड वापरकर्त्यांना Buy 1 Get 1 Free

वेलची खाण्याचे 3 जबरदस्त फायदे! पचनापासून तोंडाच्या फोडांपर्यंत ठरते गुणकारी

स्वयंपाकघरात वापरली जाणारी वेलची (इलायची) केवळ अन्नाची चव आणि सुवास वाढवण्याचे काम करत नाही, तर आरोग्यासाठीही ती

Old Phone Reuse: जुना स्मार्टफोन तुमच्या गाडीसाठी डॅशकॅम म्हणून वापरता येतो; कसे ते जाणून घ्या

Old Phone Reuse: रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि रोड रेजच्या घटना बघता, आपल्या चारचाकी गाडीत डॅशकॅम बसवणे गरजेचे आहे.

मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे

मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका