सोन्यात सलग पाचव्यांदा वाढ बाजारातील दबाव कायम !

प्रतिनिधी: सलग पाचव्या दिवशी सोन्यात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय टेरिफ दबावाचा फटका कायम असल्याने आज पुन्हा सोन्यात सकाळपर्यंत किरकोळ वाढ झाली आहे. रशियावर ५० दिवसांचा मुदतीनंतर १००% टेरिफची चेतावणी डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच दिली. याशिवाय ब्रालीलनंतर युरोपियन युनियन कॅनडा, मेक्सिको यांच्यावर मोठा टेरिफ कर लादल्याचा परिणाम आजही जाणवत आहे. पर्यायाने आजही सोने महागले.

' गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात सकाळपर्यंत १ रूपये इतक्या किरकोळ वाढ झाल्याने सोन्याचे दर ९९८९ रुपयांवर पोहोचले तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये वाढ झाल्याने किंमत ९१५६ रूपयांवर पोहोचली. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये वाढल्याने किंमत ७४९२ रुपयांवर पोहोचली आहे.

माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपये वाढ झाल्याने दर पातळी ९९८९० रुपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपयांनी वाढ झाल्याने दर पातळी ९१५६० रूपयांवर पोहोचली. १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १० रूपये वाढ झाल्याने दर पातळी ७४९२० रूपयांवर पोहोचली आहे.

भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरांत २४ कॅरेट सोन्याचे सरासरी दर ९९८९ रूपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९१५६, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ७४९२ रुपयांवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) यांमध्ये सकाळपर्यंत ०.१८% वाढ झाली होती. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३९% वाढ झाल्याने प्रति डॉलर सोन्याचा दर ३३५६.१२ औंसवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) मधील सोन्याच्या निर्देशांकात ०.१४% वाढ झाल्याने एमसीएक्स दर पातळी ९७९११ रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सोन्याचा एक लाखाचा टप्पा पार करण्यासाठी आता काही क्षण अवधी उरला आहे.

आंतरराष्ट्रीय टेरिफ दबावामुळे, वाढत्या अनिश्चितेतील वाढत्या मागणीमुळे, यापूर्वी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा बुकिंग पार्श्वभूमीवर सोने सातत्याने वाढत आहे. विशेषतः डॉलरमध्ये रुपयांच्या तुलनेत सातत्याने वाढ होत असल्याने सोन्याला सपोर्ट लेवल प्राप्त झाली होती जी आजही कायम आहे. मात्र सातत्याच्या दबावाने बाजारात सोन्यात चढउतार कायम राहील असा अंदाज आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार ! सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

Nashik Kumbhmela : हिंदू धर्मीयांच्या आस्थेशी जोडलेल्या कुंभमेळ्याने गतवर्षी प्रयागराजमध्ये गर्दीचे नवे विक्रम

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच