Panvel Drugs: पनवेलमध्ये सापडले तब्बल ३५ कोटींचे ड्रग्ज! एका नायजेरियन महिलेला अटक

पनवेल:  नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्टेशन सारख्या गजबजलेल्या ठिकाणांहून तब्बल ३५ कोटींच्या ड्रग्जचा माल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनवर बेंगळुरुमधील नारकोटिक्स नियंत्रण विभागाने (NCB) केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ३५ कोटी रुपयांचे तब्बल साडेतीन किलो 'मेथ' ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली असून, पुढील तपास रेल्वे पोलीस आणि NCB एकत्रितपणे करत आहेत. ही कारवाई विशेषतः रेल्वे मार्गांचा गैरवापर करून ड्रग्ज वाहतूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध एक मोठा झटका मानला जात आहे.

NCB व रेल्वे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या नायजेरियन महिलेमार्फत कोणत्या टोळीशी संपर्क आहे, ही ड्रग्ज कुठून आणली गेली आणि कुठे पोहोचवायची होती, याचा शोध घेतला जात आहे.

कसा झाला पर्दाफाश?


बेंगळुरु NCBच्या गुप्त माहितीच्या आधारे, मंगला एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेवर लक्ष ठेवण्यात आले होते. संबंधित महिला पनवेल स्थानकावर पोहोचताच, NCB आणि पनवेल रेल्वे पोलीस यांच्या पथकाने तिला अटक केली. तिच्याकडून 'मेथाम्फेटामाइन' हा अत्यंत घातक आणि व्यसनाधीन बनवणारा पदार्थ सापडला. हे ड्रग्ज साडेतीन किलो वजनाचे असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.

सध्या जप्त करण्यात आलेले ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपी महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

ड्रग्स तस्करीसाठी रेल्वेचा वापर!


"बेंगळुरु NCBच्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई यशस्वी झाली. ड्रग्स तस्करीसाठी रेल्वेचा वापर होत असल्याचे समोर येत असून, अशा प्रकारच्या कारवायांसाठी रेल्वे पोलीस आणि NCB मिळून कठोर पावले उचलत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे,'' अशी माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त प्रज्ञा शेडगे यांनी दिली आहे.
Comments
Add Comment

जनाब संजय राऊत माफीवीर! भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल; महाराष्ट्रासह देशातील जनतेचीही माफी मागण्याची मागणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्याच्या मुद्द्यावरून भाजपने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

Rajgira Kheer : नवरात्रीच्या उपवासात थकवा जाणवतोय ? दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ट्राय करा ही चवदार राजगिरा खीर.

  [caption id="attachment_1066892" align="aligncenter" width="850"] राजगिरा, दूध, बदाम आणि ड्रायफ्रूट्सचा हा परफेक्ट संगम तुमच्या उपवासाचा उत्साह

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील