शहरात डेंग्यू रुग्ण संख्येत तिपटीने वाढ

नाशिक रोडला सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद


नाशिक : शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनला आहे. जूनमध्ये २५ वर असलेली डेंग्यू रुग्णसंख्या जुलैत तिपटीने वाढली आहे. जुलैच्या गेल्या २८ दिवसांत तब्बल ७५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामध्ये नाशिकरोडमध्ये सर्वाधिक २३, तर त्या खालोखाल सातपूरमधील १४ रुग्णांचा समावेश आहे.
पावसाळा सुरू होताच शहरात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला आहे. मे महिन्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढत आहे. जानेवारीत ३७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीत ३२, मार्च : २१, एप्रिल : १५, मे महिन्यात १७, तर जून महिन्यात २५ रुग्ण आढळले होते. जुलैच्या गेल्या २८ दिवसांतच डेंग्यू रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात डेंग्यूचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिकरोड विभागातील सर्वाधिक २३ रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूच्या अळ्या तपासण्यासाठी सहा विभागांत मोहीम हाती घेण्यात आली असून, दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली. नाशिक शहरात मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्यामुळे जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले.

डेंग्यू आजाराच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. या स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. तसेच मोकळे भूखंड, उद्याने, मैदाने या ठिकाणी गवत वाढून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच हवामान बदल झाल्यामुळे डासांना पोषक वातावरण निर्माण झाले. पंचवटी, जेल रोड, म्हाडा कॉलनी या परिसरात उघड्या सार्वजनिक शौचालयांमुळे डासांचा उद्रेक वाढला आहे.

विभागनिहाय डेंग्यू रुग्णसंख्या अशी...



  • नाशिकरोड : २३

  • सिडको : १२

  • पंचवटी : ७

  • नाशिक पूर्व : ११

  • सातपूर : १४

  • नाशिक पश्चिम : ८

Comments
Add Comment

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदाची दिवाळी झलक; अगस्त्य-आराध्याचा फोटो चर्चेत

Navya Naveli Nanda: नव्या नवेली नंदा हिने बच्चन कुटुंबीयांच्या दिवाळी सोहळ्याचे फोटो शेअर केले. अगस्त्य नंदा आणि आराध्या

Celebrity Diwali Party: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत मनोरंजन विश्वातील कलाकारांची दमदार एन्ट्री

[caption id="attachment_1073730" align="alignnone" width="800"] दिवाळी निमित्त निर्माती एकता कपूरने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. टेलिव्हिजन व

मुंबई- पुणे प्रवास सुसाट! जुना Mumbai-Pune Highway होणार सहापदरी, काय आहे MSRDC चा प्लॅन?

मुंबई: मुंबई- पुणे या दोन शहराला जोडणाऱ्या मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई- पुणे महामार्ग असे दोन पर्याय

Farah Khan Fake Viral Video: फराह खानच्या घराला लागली आग? खोट्या अफवांवर फराह खानचे प्रतिउत्तर

Farah Khan Fake Viral Video: चित्रपट निर्माती फराह खान आजकाल सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सध्या ती चित्रपटांपेक्षा तिच्या

Prabhadevi Station Bridge: प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; फलाटावर ये-जा करण्यासाठी पूल खुला

मुंबई : प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी फलाटावर जा-ये

Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये भीषण आग; अंगावर काटा आणणारी घटना, घरातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू

Dharashiv Fire Incident News: धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घराला लागलेल्या भीषण