शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा'तारीख पे तारीख', निकाल ऑक्टोबरपर्यंत लांबणार!

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण पुन्हा एकदा यावर 'तारीख पे तारीख'चीच पुनरावृत्ती झाली आहे. आता या प्रकरणाचा अंतिम निर्णय ऑक्टोबरमध्येच येण्याची शक्यता आहे.


या विलंबामागे पुन्हा एकदा न्यायालयीन गुंतागुंतच कारणीभूत ठरली आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन केलं असून, १९ ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती सूर्यकांत सहभागी असल्याने, शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीला वेळ देणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.


न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना वादाची सुनावणी सुरू होती. त्यामुळे त्यांचा घटनापीठात सहभाग म्हणजे शिवसेना प्रकरणाला आणखी विलंब. घटनापीठाची सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याने, शिवसेना चिन्ह आणि नावाचा निर्णय आता सप्टेंबरच्या उत्तरार्धात किंवा थेट ऑक्टोबरमध्येच अपेक्षित आहे.



या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने यापूर्वीच ही सुनावणी तातडीने घ्यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. खुद्द न्यायमूर्ती सूर्यकांत यांनीदेखील “या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, आता यावर अंतिम निर्णय घेणारच,” असं ठामपणे सांगितलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच शिवसेना वादाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शिवसेनेच्या दोन गटांचा संघर्ष थांबण्याऐवजी आता तो निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकच गहिरा होण्याची चिन्हं आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब, सत्तासंघर्षाची तीव्रता आणि प्रतीक्षेत असलेला अंतिम निकाल – हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा स्फोट घडवू शकतं.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : अटल सेतू ते मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण; प्रवासात 90 मिनिटांपर्यंत बचतीची अपेक्षा

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग

महाराष्ट्रात लिफ्ट सुरक्षेचे नियम कडक; CCTV, विमा आणि मासिक देखभाल अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

राज्य सरकारने निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमधील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकवेसाठी सुरक्षा

दिवाळीत मच्छीमारांच्या भेटीला जाणार मंत्री नितेश राणे, वर्सोव्यात साधणार संवाद

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवरील मच्छीमार

Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये भीषण आग; अंगावर काटा आणणारी घटना, घरातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू

Dharashiv Fire Incident News: धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घराला लागलेल्या भीषण

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची उघडीप; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील 5 दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather News: राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता हवामानात बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने

Devendra Fadnavis Farmer Visit: शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिवाळी; भाऊबीजेला अरुणाताईंची खास विनंती

Nagpur:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त