इन्स्टाग्रामचे नवीन फीचर्स युजर्ससाठी किती सुरक्षित ?

मुंबई : इन्स्टाग्रामने नुकतेच आपल्या युजर्ससाठी तीन नविन फीचर्स आणले आहेत . युजर्सचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी हे फीचर्स लॉन्च केले आहेत . इन्स्टाग्रामने या अपडेट्सबाबत अधिकृत घोषणा देत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम चे चीफ एडम मोसेरी यांनी एक रील पोस्ट करून नवीन फीचर्सबद्दल माहिती दिली . तसेच हे नवीन फीचर्स सर्व इन्स्टाग्राम युजर्ससाठी उपलब्ध असतील असंही ते म्हणाले .


नेमके हे फीचर्स कोणते आहेत ?


इन्स्टाग्रामने आणलेल्या फीचर्स पैकी पहिलं आहे , रिपोस्ट (Reposts) ऑप्शन ज्याद्वारे युजर्स त्यांच्या फॉलोअर्स आणि मित्रांनी तयार केलेला कंटेंट सहजपणे शेअर करू शकतात . दुसरं फीचर म्हणजे मॅप (Map) जो तुमच्या DM मध्ये दिसतो . याद्वारे तुम्ही जिथून तुमचे मित्र कंटेंट पोस्ट करत आहे ते जाणून घेऊ शकता . आणि तुम्ही निवडू शकता की कोणाला तुमचं अॅक्टिव्ह लोकेशन दिसावं . उदा; सर्व मित्र , Close Friends , काही निवडक लोक, किंवा कोणीच नाही. हे लोकेशन अपडेट फक्त तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही अ‍ॅप उघडता .हा पर्याय तुम्ही कधीही बंद करू शकता. तिसरं इन्स्टाग्राम फीचर रील्स मध्ये एक नवीन "Friends" टॅब आहे. या टॅबमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनी कोणते रील्स पाहिले, लाइक केले, कॉमेंट केली किंवा रिपोस्ट केली , हे सगळं दिसेल. या सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनी लाईक केलेले किंवा कमेंट केलेले व्हिडीओ देखील पाहू शकता.


इन्स्टाग्रामच्या रिपोस्ट् फीचरद्वारे, युजर्स आता सहजपणे पब्लिक रील्स शेअर करू शकतात आणि त्यांच्या मित्रांसह पोस्ट फीड करू शकतात. जेव्हा तुम्ही कोणताही कंटेंट रिपोस्ट करता तेव्हा तो तुमच्या मित्रांच्या आणि फॉलोअर्सच्या फीडमध्ये दिसेल. आणि तुम्ही पुन्हा पोस्ट केलेला जो कंटेन्ट आहे तो तुमच्या प्रोफाइलवर एका वेगळ्या टॅबमध्ये दिसेल . जितके युजर्स कन्टेन्ट रीपोस्ट करतील ते क्रेडिट ओरिजनल क्रिएटरला ऑटोमॅटिकली मिळेल .


इन्स्टाग्रामचे मॅप फीचर आपल्याला मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी मदत करते . जर एखादे अकाउंट parental supervision मध्ये असेल आणि लोकेशन शेअरिंग सुरू केले असेल, तर पालकांना नोटीफिकेशन येईल. आणि त्याचे नियंत्रण सुद्धा पालक करू शकतात. या फीचरद्वारे तुम्ही जगभरातील मनोरंजक आणि अद्वितीय ठिकाणांवरील तुमच्या मित्रांनी आणि आवडत्या क्रिएटर्सनी शेअर केलेल्या पोस्ट देखील एक्सप्लोर करू शकता. तुम्हाला नवीन मजेदार ठिकाणं पाहायची असतील किंवा फक्त अपडेट राहायचं असतील तर इन्स्टाग्रामचं हे फीचर कनेक्ट राहण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग आहे.


इन्स्टाग्रामचे फ्रेंड्स फीचर हे रील्समध्ये लाँच केलेले एक नवीन सेक्शन आहे , ज्यामध्ये तुमच्या मित्रांनी लाईक केलेले, कॉमेंट केलेले, रिपोस्ट केलेले आणि स्वतः बनवलेले रील्स एका ठिकाणी पाहता येतात. यामध्ये ब्लेन्डस (Blends) नावाचा शेअर केलेला रील्स फीडही दिसतो, ज्यातून आपल्या आवडीचा कंटेंट सहज सापडतो. फ्रेंड्स टॅबमध्ये असलेल्या रिप्लाय बारच्या मदतीने तुम्ही थेट DM मध्ये रिप्लाय करू शकता. तसेच, Privacy Controls च्या सहाय्याने तुम्ही तुमची activity इतरांपासून लपवू शकता किंवा विशिष्ट लोकांचे updates mute करू शकता, त्यामुळे हा फीचर अधिक वैयक्तिक आणि नियंत्रित अनुभव देतो.


इन्स्टाग्रामच्या या नवीन अपडेटमुळे प्लॅटफॉर्म अधिक सोशल-केंद्रित, interactive आणि कनेक्शन-ओरिएंटेड बनला आहे. रिपोस्ट फीचरमुळे वापरकर्ते इतरांचा कंटेंट सहजपणे शेअर करून क्रिएटर्सची पोहोच वाढवू शकतात इन्स्टाग्राम मॅप फीचर लोकेशन शेअरिंग अधिक सुरक्षित व नियंत्रित करते, जिथे लोकेशन फक्त अ‍ॅप उघडल्यावर अपडेट होते आणि पालक नियंत्रणाची सोय असल्यामुळे किशोरवयीन वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढते . आणि क्रिएटर्स ला त्यांचा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल .

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच