भारतात आयफोन १७ च्या उत्पादनाला सुरूवात


मुंबई : ॲपलसाठी स्मार्टफोन तयार करणारी फॉक्सकॉन कंपनीने भारतात आयफोन १७ चे उत्पादन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उत्पादन बेंगळुरू येथील नव्या प्रकल्पात सुरू झाले असून या युनिटमध्ये तब्बल २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनबाहेर फॉक्सकॉनची ही दुसरी सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग साइट आहे.


याआधी चीनने भारतात आयफोन बनवणारे ३०० हून अधिक अभियंते व तंत्रज्ञ अचानक परत बोलावून घेतले होते. त्यामुळे आयफोन १७ च्या उत्पादनात अडथळा निर्माण झाला होता. आता कंपनी तैवानसह इतर देशांतून तज्ज्ञांना बोलावून हा तुटवडा भरून काढत आहे. सध्या भारतात आयफोन १७ चे उत्पादन मर्यादित प्रमाणात सुरू आहे.


चीनी अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत होते


फॉक्सकॉनच्या हाय-टेक असेंब्ली लाईन, कारखाना डिझाईन आणि भारतीय कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम चीनी अभियंते करत होते. यासाठी भारत सरकारने त्यांना विशेष व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली होती, जेणेकरून उत्पादनात कोणतीही अडचण येऊ नये.


अमेरिका बाजारात भारत आघाडीवर


भारत आता चीनला मागे टाकत अमेरिकेला स्मार्टफोनचा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. एका रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत अमेरिकेत आयात झालेल्या स्मार्टफोनपैकी तब्बल ४४ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’ होते. गेल्या वर्षी ही टक्केवारी फक्त १३ टक्के होती. दुसरीकडे, चीनचा हिस्सा याच कालावधीत ६१ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.


भारत आयफोन मॅन्युफॅक्चरिंग हबकडे वाटचाल करत


जून २०२५ पर्यंत भारतात २.३९ कोटी आयफोन तयार झाले असून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ७८ टक्के आयफोन भारतातच बनवले जात आहेत. २०२४ च्या तुलनेत या उत्पादनात तब्बल ५३ टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एका रिसर्च अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात भारतातून निर्यात झालेल्या आयफोनची संख्या २.२८ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १.५० कोटी होता, म्हणजेच वार्षिक तुलनेत ५२टक्के वाढ झाली आहे.


भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढल्यामुळे भारत आयफोन उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात झपाट्याने जागतिक हब बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''