वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वादळ थेट १३.१७% उसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वादळ आले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर थेट १३.१७% उसळला आहे ज्यामुळे कंपनीच्या शेअरचा दर ४५०.३५ रूपयांवर सुरु होता. प्रामुख्याने दुपारपर्यंत ११% हून अधिक उसळ ला असून सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यावरच कंपनीचा शेअर ९% हून अधिक पातळीवर उसळला होता.ही वाढ प्रामुख्याने केंद्र सरकारने टेक्सटाईल आयात केलेल्या कॉटन वस्तूंच्या ड्युटी मुक्तीला अधिक वाढीव मुदत दिली आहे. त्यामुळे आता टेक्सटाईल कंपन्यांना या निमित्ताने दिलासा मिळाला आहे. सरकारने ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली असल्याने तूर्तास टेक्सटाईल उद्योगांना दिलासा मिळाला.


दैनंदिन चार्ट पाहिल्यास कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांच्या सत्रात २% वाढला आहे. तर गेल्या महिनाभरातील कामगिरी पाहता कंपनीच्या शेअरने मात्र गटांगळी खाल्ली आहे. मागील महिन्यात कंपनीचा शेअर ६.७% घसरला होता. सरकारच्या या निर्णयामुळे ११% आयातीवरील ड्युटी वाचल्याने गुंतवणूकदारांनी सरकारात्मक कौल कंपनीच्या शेअरला दिली आहे. सध्या कॉटन मार्केटमध्ये दिवसेंदिवस कच्च्या मालाची किंमत वाढ असताना या ड्युटी माफीने उत्पादनांच्या किंमती नियंत्रित होतील असा तज्ञांचा कयास आ हे. याशिवाय हे विस्तार उत्पादकांना कामकाज स्थिर करण्यासाठी आणि किफायतशीर स्पर्धात्मक राहण्यासाठी मोकळीक प्रदान करते. त्यामुळे कंपनीचा शेअर दिवसभरात उसळला आहे.

Comments
Add Comment

दिवाळीत हुडहुडी भरणार की घामाघूम होणार? हवामानाबाबत आली अत्यंत महत्त्वाची अपडेट!

दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होत आहेत. एका बाजूला दिवसा कडक ऊन चटका देत असले, तरी

Kanpur Hit & Run Case: थार गाडीची स्कूटर चालवणाऱ्या तरुणाला धडक; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

Kanpur Hit & Run Case: उत्तर प्रदेश येथील कानपूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार कारने स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला धडक

अखेर तो प्रयोग फसला! तरीही सुनील गावस्कर म्हणतात, 'यात काहीही चुकीचे नव्हते...'

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अत्यंत

Farmers Visit: दुष्काळाच्या सावटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीर; शेतकऱ्यांसोबत वनमंत्री गणेश नाईक यांची दिवाळी

ठाणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटाचा सामना करत असताना, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना या कठीण

Mumbai Fire Incident: अंधेरीतील उंच इमारतीला भीषण आग, धुरात गुदमरून एकाचा मृत्यू

मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका

Maharashtra CM Farmer Visit: 'अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी...' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा

Nagpur: राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट ओढवले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.