टी-२०मधील सर्वात धक्कादायक निकाल, दुबळ्या नामिबियाने बलाढ्य द. आफ्रिकेला हरवले


विंडहोक : क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे.


या विजयामुळे नामिबियाने क्रिकेट जगतात एक मोठी नोंद केली आहे. हा सामना नामिबिया क्रिकेट ग्राउंड विंडहोक  येथे खेळवण्यात आला होता.



क्विंटन डी कॉकचे पुनरागमन ठरले अपयशी


दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विनटन डी कॉक (Quinton de Kock) या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता, पण तो केवळ १ धाव काढून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३४ धावा करू शकला. नामिबियाकडून रुबेन ट्रंपलमनने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने २८ धावा देऊन ३ बळी घेतले.



नामिबियाचा थरारक विजय


१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने २० षटकांत ६ गडी गमावून १३८ धावा केल्या आणि ४ गडी राखून विजय मिळवला. नामिबियाला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. यष्टीरक्षक फलंदाज झेन ग्रीनने (Zane Green) चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.


झेन ग्रीनने २३ चेंडूंमध्ये नाबाद ३० धावांची खेळी केली, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने २१ धावांचे योगदान दिले. हा विजय नामिबियासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण नामिबियाने प्रथमच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे.


Comments
Add Comment

IND vs NZ: पाचव्या टी20 सामन्यातही भारताचा पराभव, न्यूझीलंडने 7 विकेट्सने सामना जिंकला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा निकाल 3-2 असा लागला. भारताने या तीन सामने जिंकल्याने

IND vs NZ: न्यूझीलंडमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही? जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाचं काय?

[caption id="attachment_1071151" align="aligncenter" width="800"] भारत ए आणि न्यूझीलंड ए यांच्यात औपचारिक कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या

IND vs NZ: संजू सॅमसन न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा फेल, संधी आणि बॅटिंगचं झोंबणारं कटू सत्य

भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांची तशी काही चिंता

Rohit Sharma : विजय हजारे ट्रॉफीत रोहितचा जलवा पाहायला मिळणार; मुंबईकडून खेळण्यास होकार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये

IND vs NZ 5th T20: पाचव्या सामन्यात न्यूझीलंडच्या मनासारखं, भारताची प्रथम फलंदाजी; श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून शेवटचा सामना होत आहे. पाचवा टी20 सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ, न्यूझीलंड पहिल्या स्थानावर; भारतालाही होणार फायदा! कसं काय समजून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं दोन वर्षांचं गणित असतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला 2025