फलटण नगरपालिका निवडणुकीत पुन्हा ‘नाईक निंबाळकर’ विरुद्ध ‘नाईक निंबाळकर’ सामना; अर्ज भरतीच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय ट्विस्ट

फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी उडाली असून अनेक ठिकाणी नवी समीकरणे, नवी आघाड्या आणि जुन्या वादाच्या नव्या अध्यायांना सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेत मात्र पारंपरिक राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय हालचालींमुळे फलटणमध्ये पुन्हा एकदा ‘रामराजे नाईक निंबाळकर’ विरुद्ध ‘रणजितसिंह नाईक निंबाळकर’ अशी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल केले असून ते धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात उतरतील. विशेष म्हणजे, रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्या चिरंजीवांनी शिवसेनेची बाजू सांभाळली आहे.


दुसरीकडे, भाजपाने शेवटच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. मागील काही दिवसांपासून दिलीपसिंह भोसले यांच्या नावाची चर्चा होती; मात्र अंतिम क्षणी समीकरण बदलत भाजपाने समशेरसिंह यांच्यावर विश्वास ठेवला.


या घडामोडींमुळे फलटणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट मुकाबला ठरणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय वर्चस्वाची चुरस स्थानिक पातळीवर अनुभवायला मिळणार आहे. फलटणची निवडणूक त्यामुळे अधिकच लक्षवेधी बनली आहे.

Comments
Add Comment

नसीरुद्दीन शाह 'सरफरोश'मधील 'गुलफाम हसन' प्रत्यक्षात उतरवत आहेत का?, अमीत साटम यांचा सवाल

भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी विरोधकांच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस आणि

राष्ट्रवादीत नाराजीचा सूर? झिशान सिद्दीकींच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सिद्धार्थ कांबळेंचा राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईतील संघटनात्मक नियुक्तीवरून नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण करणे दुर्दैवी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका

ठाणे : प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीतील मित्रपक्षांनी आत्मपरीक्षण करावं, शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांचं विधान

आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय अधिक सुकर करण्यासाठी आणि तिन्ही पक्षांमधील परस्पर संवाद अधिक दृढ

Navnath Ban: बॅलेट असो वा ईव्हीएम, जनतेचा काँग्रेसवर विश्वास नाहीच; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

नवी दिल्ली: "कालपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी करणारे नेते आता देशभरात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक

Nitesh Rane: महायुतीत शकुनी मामा आहेत का, तपासण्याची वेळ!

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी पाच वर्षांपूर्वी