डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून ढाकणे यांनी हा पदभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी डॉ. ढाकणे यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ढाकणे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली.

डॉ. ढाकणे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सन १९९४ मध्ये नाशिक येथे उप जिल्हाधिकारी म्हणून झाली. डॉ .ढाकणे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आजवरच्या ३१ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र शासनाच्या वित्त व उद्योग मंत्रालयात अतिरिक्त खासगी सचिव, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांची जबाबदार पार पाडली आहे.

तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) आणि मालेगाव येथे उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात खासगी सचिव, ऊर्जा मंत्रालयात खासगी सचिव, ‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक, वित्त मंत्री यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळात सह व्यवस्थापकीय संचालक, मुंबईत अपर जिल्हाधिकारी व नियंत्रक (अतिक्रमण निर्मूलन / निष्कासन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अलीकडे ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते.
Comments
Add Comment

ससून डॉकचा कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवणार - मंत्री नितेश राणे; कोळंबी सोलणाऱ्या मच्छीमार महिलांना सुरक्षा किटचे वाटप

मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी; मुकेश अंबानींनी घेतले बाप्पाचे दर्शन

मुंबई: जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली असून, गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जिओचा शेअर

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने परस्पर निर्णय देत ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा

मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे - पांजरापूर मधील येवई येथील महासंतुलक

Mahaparinirvan Din 2026: महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासन सज्ज! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या

Mumbai Police : मुंबई पोलिसांची सुरक्षा अधिक मजबूत! लादेनचा शोध घेण्यास मदत करणारी श्वानप्रजात ताफ्यात होणार दाखल

Mumbai News: मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या कुत्र्यांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू आहे.