मुंबईकरांनो, पुढचे सात दिवस पाणी उकळून, गाळून प्या !

पिसे - पांजरापूर संकुल मधील येवई येथील महासंतुलक जलाशय कप्पा क्रमांक २ दुरुस्तीचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे - पांजरापूर मधील येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. येवई महासंतुलक जलाशय कप्पा क्रमांक २, बुधवार, २८ ऑक्‍टोबर २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे तसेच मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ७ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे नम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.


मुंबई शहर, पूर्व उपनगरे यांसह मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांत पाणीपुरवठा केला जाणा-या भागांतील नागरिकांनीही योग्‍य ती खबरदारी घ्‍यावी. पाण्याच्या गुणवत्तेबाबत संभाव्य परिणाम लक्षात घेता, पुढील ७ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. खबरदारीच्या या सूचनांचे पालन करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



प्रभावित विभागांचा तपशील


मुंबई शहर विभाग


ए विभाग - नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसर


बी विभाग - संपूर्ण परिसर


ई विभाग - संपूर्ण परिसर


एफ दक्षिण विभाग - संपूर्ण परिसर


एफ उत्तर विभाग - संपूर्ण परिसर


पूर्व उपनगरे


टी विभाग - मुलुंड (पूर्व) व मुलुंड पश्चिम


एस विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व)


एन विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर


एल विभाग - कुर्ला (पूर्व)


एम पूर्व विभाग - संपूर्ण परिसर


एम पश्चिम विभाग - संपूर्ण परिसर

Comments
Add Comment

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने परस्पर निर्णय देत ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा

Mahaparinirvan Din 2026: महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासन सज्ज! विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या

Mumbai Police : मुंबई पोलिसांची सुरक्षा अधिक मजबूत! लादेनचा शोध घेण्यास मदत करणारी श्वानप्रजात ताफ्यात होणार दाखल

Mumbai News: मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या कुत्र्यांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू आहे.

Diwali Pollution : प्रदूषण पसरवणारे नको तर हरित फटाके फोडा! ; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्यविषयक दुष्परिणामाबाबत

National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 14 हजार 787 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे

मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी

Pratap Sarnaik: ओला, उबेर, रॅपिडोसाठी परिवहन मंत्र्यांचे कडक नियमावली, नियम मोडलात तर थेट जेल; वाचा सविस्तर

मुंबई: रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी