भारतात २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्‍यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रकाशित केला असून अहवालानुसार भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे. ऑक्‍टोबर २०२४ व सप्‍टेंबर २०२५ दरम्‍यान सेक्‍यूराइट लॅब्‍सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्‍ट्सचे विश्‍लेषण केले. यामध्ये वाढत्या सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. अहवालातील प्राथमिक आकडेवारीनुसार २६५.५२ दशलक्ष डिटेक्‍शन्‍सची म्हणजेच गुन्ह्यांची नोंद केली गेली आहे. तसेच माहितीनुसार, हे प्रमाण दररोज ७२७००० हून अधिक डिटेक्‍शन्‍स आणि दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या परिसंस्‍थेमध्‍ये (Ecosystem) मध्ये ट्रोजन्‍स व फाइल इन्‍फेक्‍टर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे जेथे ८.४ दशलक्ष ट्रोजन डिटेक्‍शन्‍स आणि ७१.१ दशलक्ष फाइल इन्‍फेक्‍टर डिटेक्‍शन्‍सची नोंद करण्‍यात आली. भारतातील कंपन्‍यांवर झालेल्‍या एकूण हल्‍ल्‍यांपैकी एकत्रित त्‍यांचे ७०% प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे.


नेक्‍स्‍ट जनेरशन अँण्‍टीव्‍हायरस (एनजीएव्‍ही) आणि अँण्‍टी रॅन्‍समवेअर (ARW) इंजिन्‍सनी ३४ दशलक्षहून अधिक असामान्‍य संशयी क्रियांना (Activity) ओळखले आहे असे कंनपीकडून प्रकाशित झालेला अहवाल सांगतो. जानेवारी २०२५ मध्‍ये १८५ घटना आणि ११३,००० डिटेक्‍शन्‍ससह रॅन्‍समवेअर घटना सर्वोच्‍च होत्या तर क्रिप्टोजॅकिंग डिटेक्‍शन्‍स ६.५ दशलक्षपर्यंत पोहोचले. नेटवर्कशी आधारित घटना ९.२ दशलक्षपर्यंत पोहोचल्‍या आहेत. जेथे वर्डप्रेस प्‍लगइन्‍स, अपाचे टॉमकॅट आणि सिसएड सिस्‍टम्‍समध्‍ये तडजोड करण्‍याचा वारंवार प्रयत्‍न करण्‍यात आला असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


सर्वाधिक हल्ले महाराष्‍ट्र (३६.१ दशलक्ष डिटेक्‍शन्‍स), गुजरात (२४.१ दशलक्ष) आणि दिल्ली (१५.४ दशलक्ष) राज्यात झाले आहे. त्यापैकीही सर्वाधिक सायबर सिक्युरिटी सुरूक्षेला हरताळ फासले जाण्यात मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता या शहरांचा समावेश होता. उद्योगासंदर्भात शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्रांचे एकत्रितपणे सर्व डिटेक्‍शन्‍समध्‍ये ४७% प्रमाण होते. अहवालाच्या म्हणण्यानुसार, यावर अद्याप तातडीने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेली त्‍यामधील संसाधने मर्यादित आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात अद्याप या विषयावर गांभीर्याने घेतले जात नाही. याचा फटका युजरला बसतो आहे आणि ते मोठ्या प्रमाणात हल्ल्यांना बळी पडतात.


आजची सायबर जोखीम क्षेत्राची गंभीर स्थिती आणि कार्यसंचालनामध्‍ये अडथळा आल्‍यामुळे प्रत्‍येक वेळी व्‍यवसायांना होणारे मोठे आर्थिक नुकसान पाहता सेक्‍यूराइटने दोन अत्याधुनिक एंटरप्राइज-ग्रेड उपाय लॉन्च केले असून डिजिटल रिस्क प्रोटेक्शन सर्विसेस हे एआय–एमएल आधारित ब्रँड सुरक्षा, डार्क वेब मॉनिटरिंग आणि डिजिटल जोखीम व्यवस्थापन सक्षम करते तर रॅन्समवेअर रिकव्हरी अ‍ॅज सर्विस हे हे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलेल्या फॉरेन्सिक-ग्रेड पद्धतीचे उत्पादन असून सायबर सुरक्षेचे उल्लंघन आणि सुरक्षितता पुनर्स्थापनादरम्यानची दरी हे उत्पादन प्रभावीपणे भरून काढते असे अहवालाने म्हटले.


याविषयावर भाष्य करताना क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. संजय काटकर म्‍हणाले आहेत की,'आज भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्र महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यावर आहे, जेथे अनपेक्षित जोखीमांचा सामना करत आहे. इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ चा धोरणकर्ते, उद्योग व नागरिकांना इंटेलिजन्‍स देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे ते सर्वसमावेशक जोखीम ओळखू शकतील आणि सक्रिय सायबर सुरक्षा पद्धतींचा अवलंब करू शकतील.


ते पुढे म्हणाले लाँच करण्‍यात आलेले सेक्‍यूराइट डीआरपीएस कंपन्‍या फायरवॉल्‍स व पांरपारिक सुरक्षिततेच्‍या पलीकडे त्‍यांची सुरक्षितता अधिक वाढवण्‍यास सक्षम करेल, जेथे ब्रँड प्रतिष्‍ठा, डेटा प्रामाणिकपणा व ग्राहक विश्वासाची सतत परीक्षा होत आहे. आम्‍ही सेक्‍यूराइट आरआरएएएस देखील लाँच करत आहोत, जे रॅन्‍समवेअर रिकव्‍हरीला समस्‍यांच्‍या व्‍यवस्‍थापनावरून संरचित (Structured) तज्ञ-नेतृत्वित (Expert Directed) ऑपरेशन्‍समध्‍ये बदलते, ज्‍यामुळे रॅन्‍समवर अवलंबून राहावे लागत नाही. हे उपक्रम कंपन्‍यांना अत्‍याधुनिक टूल्‍स व माहितीसह सुसज्‍ज करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला प्रबळ करतात, ज्‍यामुळे कंपन्‍या आपल्‍या डिजिटल मालमत्तांचे संरक्षण करू शकतात, विश्वास कायम ठेवू शकतात आणि झपाट्याने वाढत असलेल्‍या जोखीम वातावरणामध्‍ये ऑपरेशनल स्थिरता राखू शकतात.'


या अहवालात भारताचे डिजिटल विस्‍तारीकरण, क्‍लाऊड अवलंबन आणि मोठ्या वापरकर्तावर्गामुळे रॅन्‍समवेअर सिंडीकेट्स, सरकारशी संलग्‍न असल्‍याचे खोटे दावे करणारे हल्‍लेखोर आणि सायबरगुन्‍हेगार समूहांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळते. ऑपरेशन सिंदूर सारख्‍या सायबर अटॅक मोहिममांमधून आर्थिक, राजकीय व विचाराशी संबंधित उद्देशांनी केल्‍या जाणाऱ्या हायब्रिड हल्‍ल्‍यांमध्‍ये वाढ झाल्‍याचे निदर्शनास येते.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :