India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?
December 20, 2025 12:40 PM
मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा आज (२० डिसेंबर) दुपारी १:३० वाजता केली जाणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निवड समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव संयुक्त पत्रकार परिषदेत १५ सदस्यीय भारतीय संघाची अधिकृत घोषणा करतील. विशेष म्हणजे, या बैठकीत केवळ वर्ल्ड कपच नाही, तर जानेवारीत होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठीही संघाची निवड केली जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून या मेगा इव्हेंटला सुरुवात होणार असून २० मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. गतविजेता भारतीय संघ 'ग्रुप-ए' मध्ये असून त्यांच्यासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामीबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. भारतीय संघ आपले साखळी सामने मुंबई (७ फेब्रुवारी), दिल्ली (१२ फेब्रुवारी), कोलंबो (१५ फेब्रुवारी) आणि अहमदाबाद (१८ फेब्रुवारी) अशा चार वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळणार आहे.
टी-२० वर्ल्ड कपसाठी संभाव्य १५ सदस्यीय भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.
एकदिवसीय (ODI) मालिका
११ जानेवारी: पहिला वनडे, वडोदरा१४ जानेवारी: दुसरा वनडे, राजकोट१८ जानेवारी: तिसरा वनडे, इंदूरटी-२० (T20I) मालिका२१ जानेवारी : पहिली टी-२०, नागपूर२३ जानेवारी : दुसरी टी-२०, रायपूर२५ जानेवारी : तिसरी टी-२०, गुवाहाटी२८ जानेवारी : चौथी टी-२०, विशाखापट्टणम३१ जानेवारी : पाचवी टी-२०, तिरुवनंतपुरम
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ : साखळी सामन्यांचे वेळापत्रक
०७ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. पाकिस्तान vs नीदरलैंड्स. SSC, कोलंबो०७ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. वेस्टइंडीज vs बांग्लादेश. कोलकाता०७ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs USA. मुंबई०८ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. न्यूजीलैंड vs अफगानिस्तान. चेन्नई०८ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. इंग्लैंड vs नेपाल. मुंबई०८ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. श्रीलंका vs आयरलैंड. प्रेमदासा, कोलंबो०८ फेब्रुवारी २०२६. ११: ००AM. बांग्लादेश vs इटली. कोलकाता०८ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. जिम्बाब्वे vs ओमान. SSC. कोलंबो०८ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. साउथ अफ्रीका vs कनाडा. अहमदाबाद१० फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. नीदरलैंड्स vs नामीबिया. दिल्ली१० फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. न्यूजीलैंड vs UAE. चेन्नई१० फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. पाकिस्तान vs USA. SSC. कोलंबो११ फेब्रुवारी २०२६. ११: ००. साउथअफ्रीका vs अफगानिस्तान. अहमदाबाद११ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. ऑस्ट्रेलिया vs आयरलैंड. प्रेमदासा. कोलंबो११ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. इंग्लैंड vs वेस्टइंडीज. मुंबई१२ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. श्रीलंका vs ओमान. कैंडी१२ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. नेपाल vs इटली. मुंबई१२ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs नामीबिया. दिल्ली१३ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. ऑस्ट्रेलिया vs जिम्बाब्वे. प्रेमदासा. कोलंबो१३ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. कनाडा vs UAE. दिल्ली१३ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. USA vs नीदरलैंड्स. चेन्नई१४ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. आयरलैंड vs ओमान. SSC, कोलंबो१४ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. इंग्लैंड vs बांग्लादेश. कोलकाता१४ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. न्यूजीलैंड vs साउथ अफ्रीका. अहमदाबाद१५ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. वेस्टइंडीज vs नेपाल. मुंबई१५ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. USA vs नामीबिया. चेन्नई१५ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs पाकिस्तान. प्रेमदासा, कोलंबो१६फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. अफगानिस्तान vs UAE. दिल्ली१६फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. इंग्लैंड vs इटली. कोलकाता१६फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. ऑस्ट्रेलिया vs श्रीलंका. कैंडी१७ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. न्यूजीलैंड vs कनाडा. चेन्नई१७ फेब्रुवारी २०२६ . ३:०० PM. आयरलैंड vs जिम्बाब्वे. कैंडी१७ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. बांग्लादेश vs नेपाल. मुंबई१८ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. साउथ अफ्रीका vs UAE. दिल्ली१८ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. पाकिस्तान vs नामीबिया. SSC, कोलंबो१८ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. भारत vs नीदरलैंड्स. अहमदाबाद१९ फेब्रुवारी २०२६. ११: ०० AM. वेस्टइंडीज vs इटली. कोलकाता1१९ फेब्रुवारी २०२६. ३:०० PM. श्रीलंका vs जिम्बाब्वे. प्रेमदासा, कोलंबो१९ फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. अफगानिस्तान vs कनाडा. चेन्नई२० फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. ऑस्ट्रेलिया vs ओमान. कैंडी२० फेब्रुवारी २०२६. ७:०० PM. ऑस्ट्रेलिया vs ओमान. कैंडी
साखळी सामने संपल्यानंतर सुपर ८, उपांत्य फेरी आणि २० मार्च २०२६ रोजी महाअंतिम सामना खेळवला जाईल.