अल्ट्राटेक सिमेंटला ७८२.२ कोटींची जीएसटी नोटीस

मोहित सोमण: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड (Ultratech Cement) कंपनीला जीएसटी विभागाने ७८२.२ कोटीची नोटीस दिल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. व्याजासगट प्रलंबित ७८२.२ कोटीची रक्कम थकबाकी असल्याचे जीएसटी नियामकांनी (GST Regulator) कंपनीला कळवले असल्याचे कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले आहे. नेमक्या शब्दात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मूळ आदेशात ३९०९५५८१९४/रूपये इतकी कर दायित्व रक्कम, तसेच कर मागणीवरील लागू व्याज, अतिरिक्त व्याज २७६८२८९ आणि ३९०९५५८१९४ रूपये इतका दंड कायम ठेवण्यात आला असे म्हटले. १९ डिसेंबरला ही अंतरिम नोटीस कंपनीला बजावण्यात आली आहे. मात्र कंपनीने उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायाचा वापर करून यावर निर्णय घेऊ असेही कंपनीने निवेदनात म्हटले. जीएसटी टॅक्स भरण्यात प्रलंब, व प्रलंबित इनपूट टॅक्स क्रेडिट यामुळे हा एकत्रित दंड कंपनीवर लावण्यात आल्याचे समजते.


भारतातील मोठ्या सिमेंट कंपन्यापैकी एक म्हणून अल्ट्राटेक सिमेंट म्हणून ओळखले जाते. आदित्य बिर्ला समूहाची ही कंपनी असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी पाटणा येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (GST) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise Duty) विभागाच्या सहआयुक्तांनी पारित केलेला आदेश प्राप्त झाल्याचेही कंपनीने म्हटले. अल्ट्राटेक कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे २०० दशलक्ष टन आहे. उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक २०१८-२०१९ व २०२२-२३ दरम्यानचे हे प्रकरण आहे. आर्थिक स्थिती मजबूत आल्याचे यापूर्वी स्पष्ट झालेले असताना कंपनीच्या विक्रीतही इयर ऑन इयर बेसिसवर २०.३% वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते.


अल्ट्राटेकने म्हटले आहे की, या कर मागणीमुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा आर्थिक स्थितीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होईल असे त्यांना वाटत नाही. आज दुपारी २.१८ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२७% वाढ झाल्याने शेअर ११५२७ रूपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर ! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला मंजुरी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

Video: फिल्डर झेल पकडत होता, पण टेम्बा बावुमा पाठमोरा उभा राहिला; असं का ते त्यानेच शेवटी सांगितलं...

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेत 1-1

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात ! राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर झालेल्या

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण, नाशिक शहरातील तयारी किती?

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. हा कुंभमेळा नाशिक आणि

Whatsapp Sim Binding Rule : व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम युजर्सना मोठा धक्का; १ जानेवारी २०२७ पासून 'सिम-बाइंडिंग' नियम बंधनकारक!

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इतर लोकप्रिय मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक अत्यंत

Loktak Lake Manipur : 'लोकटक तलावा'च्या संवर्धनासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय, 'लोकटक दिन' आता राज्य महोत्सव

इंफाळ : ईशान्य भारतातील सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या 'लोकटक तलावा'चे सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक