Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण, नाशिक शहरातील तयारी किती?

नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. तयारीबद्दल नाशिकच्या महानर पालिकेच्या महापौर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. हा कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राष्ट्रपतींसोबत चर्चा करण्यात आल्याची माहिती नाशिक महानगर पालिकेच्या महापौर हिमगौरी आहिर यांनी माहिती दिली. त्या आज माध्यमांसोबत चर्चा करत असताना त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची माहिती दिली.



नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे सदस्य, नाशिक महापालिकेचे महापौर, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. शिवाय, कुंभमेळामंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्रीही यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती हजर राहणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 च्या दिवशी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशीचा तब्बल 65 वर्षांनंतर यंदा त्रिखंडी हा अनोखा योग जुळून आला आहे. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर शंखनाद आणि गोदा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.


 


ध्वजारोहणाच्या दिवशी राष्ट्रपती नाशिकमध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहतील. ध्वजारोहण सोहळ्याला विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील आणि क्रिकेट क्षेत्रासह अन्य मान्यवरही ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. येत्या 25 ऑक्टोबर रोजी शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर शंखनाद आणि गोदा आरतीच्या माध्यमातून 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड' करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने देखील नाशिक शहरामध्ये स्थानिक प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे.



कुंभमेळा परिसरात मद्य आणि मांसविक्री बंद ठेवता येईल का, याबाबत विचार सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. मांसविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करता येईल का, याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूर आणि धूळ मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी पाण्याची फवारणी करण्याचा विचार सुरू आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मधून ईशान किशन बाहेर, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला मिळणार संधी

क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हलवर उद्या (शनिवारी) होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून भारतीय

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर ! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला मंजुरी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

Video: फिल्डर झेल पकडत होता, पण टेम्बा बावुमा पाठमोरा उभा राहिला; असं का ते त्यानेच शेवटी सांगितलं...

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यानंतर मालिकेत 1-1

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात ! राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनरच्या धडकेत महिला वकिलाचा मृत्यू

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर झालेल्या

Whatsapp Sim Binding Rule : व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम युजर्सना मोठा धक्का; १ जानेवारी २०२७ पासून 'सिम-बाइंडिंग' नियम बंधनकारक!

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इतर लोकप्रिय मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी एक अत्यंत

Loktak Lake Manipur : 'लोकटक तलावा'च्या संवर्धनासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय, 'लोकटक दिन' आता राज्य महोत्सव

इंफाळ : ईशान्य भारतातील सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या 'लोकटक तलावा'चे सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक