बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल


मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री जागरण करुन नववर्षाचा जल्लोष केला जातो. मुंबईतील सर्व समुद्र किनारे, हॉटेल, पर्यटनस्थळे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांना मध्यरात्री पण आरामात घरी जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबईतील हजारो नागरिक दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बॅण्ड स्टॅण्ड येथे जातात. तसेच हजारो नागरिक १ जानेवारीच्या सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेच घर सोडून प्रभादेवीच्या दिशेने प्रवास करतात. या सर्व बाबी विचारात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि कल्याण येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता कल्याण येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. याच पद्धतीने गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री पनवेल येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. या सर्व विशेष लोकल मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील.


Comments
Add Comment

Ramdas Athawale : नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उद्या इंदौर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जेन झी शी संवाद

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा उद्या

Prakash Abitkar : मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मुंबई :

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; कोकणवासीयांसाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या

Pratap Sarnaik : सरनाईकांच्या कानपिचक्यांनी... एसटीची गाडी रुळावर; ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी

Jai Jawan Govinda Pathak : सलग 4 वेळा प्रयत्न, तरीही जय जवान अपयशी! यंदा दहीहंडीत नक्की काय बिनसले?

 मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची