सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर कधी कलाकार क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात. क्रिकेट म्हटलं की, सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो. मग आपले मराठी सिनेसृष्टीतील कलाकार कसे मागे राहतील. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार क्रिकेटचे शौकीन आहेत. पण शुटिंग, वेळेची कमतरता यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळत नाही हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी ‘एस एस सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ चे (SSCBCL) आयोजन यंदा थेट दुबईत केले आहे. ज्योती एन्टरटेन्मेन्टचे हार्दिक जोशी आणि रंजन जोशी यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले आहे.

मनोरंजन क्षेत्रासह राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात देखील सक्रिय असणारे अभिनेता सुशांत शेलार कायमच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. कोविड काळ अथवा पूरपरिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात त्यांनी दिलाआहे. 'शेलार मामा फाउंडेशन' द्वारे ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात, ज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजासाठी गरजूंना मदत करत आपलं सामाजिक भान जपलं आहे.

एसएससीबीसीएल(SSCBCL) मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कलाकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात काही संघ असतील. या संघामध्ये पुरुष कलाकारांसोबत महिला कलाकार, माध्यमकर्मी आणि इन्फ्लुएन्सर देखील सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून पर्यावरण, संस्कृती, गडकिल्ले यांचे स्मरण रहावे यासाठी टीमची नावे त्या अनुषंगाने दिली आहेत. रत्नदुर्ग-रत्नागिरी, सिंधुदुर्ग-मालवण, ताडोबा-नागपूर, अजिंक्यतारा- सातारा, शिवनेरी -पुणे, पन्हाळा-कोल्हापूर, गोदावरी-नाशिक अशा काही टीमचा समावेश असणार आहे. एसएससीबीसीएल (SSCBCL) तसेच संघाच्या टीम मधील कलाकारांची घोषणा, लोगोचे अनावरण मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार असल्याचे या लीगचे सर्वेसर्वा अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.

अभिनेता सुशांत शेलार वेगवेगळ्या मनोरंजनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या. हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार ‘एसएससीबीसीएल’(SSCBCL) चे आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज होत आहे.
Comments
Add Comment

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'