KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती' या मराठी कार्यक्रमामुळे चर्चेत

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती' या मराठी कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. अभिनय, नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांचा मनावर राज्य करणारी माधुरी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी तिने स्वीकारली आहे. या कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका अभिनेत्रीला सूत्रसंचालक म्हणून पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे.12 ऑक्टोबर 2026 पासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात स्पर्धकांना विविध प्रश्नांची उत्तरे देत बक्षिसाची रक्कम जिंकण्याची संधी मिळते. मात्र, हा कार्यक्रम केवळ प्रश्नोत्तरांपुरता मर्यादित नसून स्पर्धकांचा संघर्ष, त्यांची स्वप्ने आणि आयुष्यातील प्रेरणादायी प्रवासावर देखील अवलंबललेला आहे. (KON HONAR CROREPATI)




धक-धक गर्लने शोला दिला ग्लॅमरस अंदाज


‘आता खेळ बदलणार’ या तिचा वाक्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या पर्वात माधुरीच्या सूत्रसंचालनामध्ये तिचा एक वेगळा टच पाहायला मिळत आहे. संगणकावरून प्रश्न बोलताना ती त्याला प्रेमाने ‘कम्प्युटर साहीबा’ अशी हाक मारते. इतकेच नाही, तर उत्तराची खात्री करताना वर्षानुवर्षे चालत आलेलया आयकॉनिक ‘लॉक करा’ या डायलॉगऐवजी ‘फायनल करूयात’ अस विचारते. तिच्या या छोट्या-मोठ्या बदलांमुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळेपण मिळाले असून प्रेक्षकांनाही हा बदल आवडलयाचे पाहायला मिळत आहे. माधुरी दीक्षितचा हा अंदाज प्रेक्षकांचा मनाला भूरळ घालताना दिसत आहे.(MADHURI DIXIT)




सोनालीच्या येण्याने रंगला 'कोण होणार करोडपती' चा पहिला भाग


कोण होणार करोडपती पर्वाच्या पहिलया भागात अभिनेत्री सोनाली बेंद्रे विशेष पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. माधुरी आणि सोनाली या दोघी पहिल्यांदाच एका कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र आलया. विशेष म्हणजे, 12 लाख 50 हजार रुपयांच्या टप्प्यावर विचारण्यात आलेलया प्रश्नाचे उत्तर देताना सोनालीने कोणत्याही लाइफलाइनचा वापर केला नाही. भरतकामाच्या कोणत्या शैलीच्या नावाचा शब्दशः अर्थ 'सोन्याचे भरतकाम' असा होतो, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यासाठी जरदोजी, कलमकारी, फुलकारी आणि मधुबनी हे पर्याय देण्यात आले होते. सोनालीने 'जरदोजी' हे योग्य उत्तर दिले. त्यानंतर माधुरीने तिला कार्यक्रमाच्या या पर्वातील पहिला चेक दिला.


 


याआधी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी केले होते


सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी, नागराज मंजुळे यांनी हा कार्यक्रम गाजवला आणि आता माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचा माध्यमातून प्रेक्षकांचा मनावर राज्य करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार