प्रिय आई-बाबा, मतदानाच्या दिवशी वेळ काढा आणि मतदान करा

पनवेल मनपाची पाल्यांमार्फत पालकांना साद


पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात स्विपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पाल्यांमार्फत पालकांना साद.


पनवेल महानगरपालिका हद्दीतील मनपा व इतर महत्त्वाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उपरोक्त पत्र देण्याचा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना निवडणुकीत मतदान करण्याबाबत विनंती असा संदेश असलेले पत्र त्यांच्याकडे देण्यात येत असून त्यांनी आपल्या पालकांकडून निवडणुकीत मतदान करण्याबाबत आश्वासन घ्यावयाचे आहे. अशा प्रकारचा संदेश जवळपास ७५ शाळांमधून १ लाख मुलांमार्फत पालकांपर्यंत पनवेल महानगरपालिका पाठवीत आहे. विद्यार्थी आपल्या घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना देतील आणि त्यांच्याकडून मतदान करणारच अशी हमी घेतील. निश्चितच या उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती होऊन पनवेल महानगरपालिकेची यावेळी मतदान टक्केवारी वाढेल असा विश्वास आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केला आहे. तर अशा अभिनव उपक्रमासोबतच महापालिकेमार्फत अन्यही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांना सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे.यात प्रामुख्याने विविध महत्त्वाच्या चौकांमधून मतदान विषयक जनजागृती करण्याची थ्रीडी पुतळे, पारंपरिक लोक कलावंत, पथनाट्य, वासुदेव, पोवाडा त्यासोबतच विविध शाळा महाविद्यालयांमधून मतदान विषयक निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा, मॅरेथॉन, सायकल रॅली, मानवी साखळी अशा प्रकारच्या उपक्रमांचा समावेश असल्याचे स्विपचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका हद्दीतील पात्र मतदारांनी येत्या १५ जानेवारीला गुरुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यास मदत करावी, असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''