Bluetooth सुरु ठेवण पडेल महागा,बँक खातं रिकामं होण्याचा धोका..! पहा काय आहे विषय ?

Bluetooth :आजच्या जमान्यात स्मार्टफोन हा सर्व लोकांची गरज बनला आहे. पण याच फोनमधील ब्लुटूथ तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. स्मार्टफोनचा वापर आज सर्वसामान्य झाला असून इअरफोन, स्पीकर, स्मार्टवॉच यांसारख्या उपकरणांसाठी ब्लुटूथचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, गरज नसताना फोनचे ब्लुटूथ सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. ब्लुटूथशी संबंधित ‘ब्लुजॅकिंग’सारख्या घोटाळ्यांमुळे बँक खात्यातील पैसेही लंपास होऊ शकतात.

अनेक वेळा इअरफोन किंवा इतर अ‍ॅक्सेसरीज डिस्कनेक्ट झाल्यानंतरही नागरिक ब्लुटूथ बंद करायला विसरतात. ब्लुटूथ सुरू ठेवण्यात काहीही धोका नाही, असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी – जसे की ट्रेन, बस, बाजारपेठ किंवा मॉल – ब्लुटूथ ऑन असल्यास सायबर गुन्हेगारांना फोनमध्ये घुसखोरी करण्याची संधी मिळते. स्कॅमर्स अज्ञात ब्लुटूथ पेअरिंग विनंत्या पाठवतात आणि चुकून त्या स्वीकारल्यास हॅकर्सना फोनमध्ये प्रवेश मिळू शकतो. एकदा फोनमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर संकेतशब्द, डेबिट-क्रेडिट कार्ड तपशील, ओटीपी आणि बँकिंग अ‍ॅप्समधील माहिती चोरणे घोटाळेबाजांसाठी सोपे होते. या माहितीच्या आधारे ते बँक खात्यातील रक्कम काढू शकतात. या प्रकारच्या फसवणुकीला ‘ब्लुजॅकिंग’ असे म्हटले जाते.

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही अ‍ॅक्सेसरी कनेक्ट नसेल तर ब्लुटूथ बंद ठेवावे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी ब्लुटूथ बंद करणे सुरक्षित ठरते. अज्ञात डिव्हाइसशी कधीही कनेक्ट होऊ नये आणि ब्लुटूथ ‘नॉन-डिस्कव्हरेबल’ मोडमध्ये ठेवावा. तसेच, मोबाईलचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स नियमितपणे अपडेट ठेवावेत.
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''