ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच


वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा) कंपनीतील कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेले सत्याग्रह आंदोलन आज सहाव्या दिवशीही अधिक तीव्र झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून पगार रखडल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी, जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कंपनीचे गेट सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर्स बनवणाऱ्या या नामांकित कंपनीत अनेक कामगार गेल्या २८ वर्षांपासून इमानेइतबारे सेवा देत आहेत. मात्र, व्यवस्थापनाने मागील दोन महिन्यांपासून या कायमस्वरूपी कामगारांचे पगार रोखून धरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या कामगारांना पगार नाही, तर दुसरीकडे कार्यालयीन कर्मचारी कामावर न येताही त्यांना पगार दिला जात असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. "हा दुजाभाव का?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ८ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्याग्रहाला संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव आणि तालुका अध्यक्ष राजू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे कामगारांचे मनोधैर्य उंचावले असून आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.


कामगारांच्या मागण्या :




  • मागील दोन महिन्यांचा थकीत पगार तत्काळ खात्यात जमा करावा.

  • कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्यातील पगाराबाबतचा दुजाभाव थांबवावा.

  •  २८ वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी.

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच