मुंबईमध्ये माजी महापौरांच्या नातेवाइकांनी मारली बाजी

भाजपच्या योगिता कोळींच्या विजयाची चर्चा


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मतमोजणीदरम्यान अवघ्या दोन तासांतच उबाठा गटाच्या हातून सत्ता जाणार हे स्पष्ट झाले. भाजप व शिवसेना महायुती सत्तासंपादनाकडे इतरांच्या मदतीने वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर मुंबईत ठिकठिकाणी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कोठे गुलाल उधळला जात होता, तर कुठे फटाक्यांनी आसमंत दणाणून गेला होता. या निवडणुकीमध्ये माजी महापौर सुनील प्रभू, विश्वनाथ महाडेश्वर आणि चंद्रकांत हंडोरे यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात होते. यापैंकी सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित, विश्वनाथ महाडेश्वर यांची पत्नी पुजा आणि चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती यांचा विजय झाला आहे. महापौरांचे नातेवाईक असलेल्या तिन्ही उमेदवारांनी आपले गड राखत आपला विजय प्राप्त केला. मुंबई महानगरपालिकेत प्रथमच भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे ८२ नगरसेवक विजयी झाले होते व भाजपने सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा दिला होता.



सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले नगरसेवक कोण


भाजप, योगिता कोळी, प्रभाग क्रमांक ४६, मताधिक्य २१,७१७
भाजप, तेजिंदर तिवाना, प्रभाग क्रमांक ४७, मताधिक्य १३, ५५८
शिवसेना, दीक्षा कारकर, प्रभाग क्रमांक ६, मताधिक्य १२,४५८
भाजप, जितेंद्र पटेल, प्रभाग क्रमांक १०, मताधिक्य : १२,२४९
भाजप तेजस्वी घोसाळकर, प्रभाग क्रमांक ३, मताधिक्य १०, ७५५
भाजप, राणी द्विवेदी, प्रभाग क्रमांक १३, मताधिक्य : १०,४०२
भाजप, योगेश वर्मा, प्रभाग क्रमांक ३५, मताधिक्य : १०,०५६



भाजपच्या योगिता कोळी सर्वाधिक २१ हजार मतांनी विजयी


मालाड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ४६मधून भाजपच्या योगिता कोळी यांनी तब्बल २१ हजार मताधिक्यानी विजय मिळवला आहे. कोळी यांना ३७ हजार एवढे मतदान झाले आहे, मनसेच्या स्नेहलिता डेहलीकर यांना १६ हजार मते मिळाली अहे. त्यामुळे योगिता कोळी २१ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या असून मुंबईतील सर्वात जास्त मताधिक्य असलेले मिळवणाऱ्या नगरसेविका ठरल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे प्रवीण शाह हे सर्वाधिक १५ हजारांच्या मताधिक्यांने मतांनी विजयी झाले होते.

Comments
Add Comment

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 24 विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : भारतीय इतिहासात 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला दिवस

मंत्री नितेश राणे यांनी मांडला महाराष्ट्राच्या सागरी विकासाचा आराखडा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रातील सागरी

FDA Raids : बीड व छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त, तर मुंबईत 'डॉमिनोज पिझ्झा'सह 3 आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध

उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था

सांताक्रूझ स्कायवॉकला छत बसवण्याचा प्रस्ताव अद्यापही रखडलेला, BMC स्थायी समितीच्या मंजुरीकडे लक्ष

मुंबई: सांताक्रूझ पूर्वेकडील स्टेशन लगत असणाऱ्या स्कायवॉकचं छत बसवण्यासाठी निविदा काढून अनेक महिने उलटले आहेत.

कचऱ्यापासून 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस' निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीला चालना