संत भावंडीबाई

आईबापा पोटी कन्या हो जन्मता
आईबापा पोटी कन्या हो जन्मता
खिन्न वाटे चित्ता सर्व जना |
परंतु कन्येचे महत्व हो थोर करिती उद्धार सुकन्या जी |
सुकन्या म्हणजे असे सुवर्तन
मनी समाधान सर्वकाळ|
भावंडी ही म्हणे पतिव्रतपणे
वागुनिया धन्य होती जगी |


- डॉ. देवीदास पोटे


भावंडीबाई या मराठी वीरशैव परंपरेतील संत कवयित्री. विरक्त परंपरेतील गुरुदास यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांचा काळ प्रबोधनकारी परिवर्तनाचा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबींचा समाजमनाला परिचय होत होता. मात्र या सुधारणावादी परिस्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीत दिसत नाही. त्यांना दीक्षा देताना गुरूंनी अशी अट घातली की तीन वर्षे त्यांनी परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. भावंबाईंनी ही अट शेवटपर्यंत पाळली.


मुलीच्या जन्मानंतर कुटुंबात होणाऱ्या नकारात्मक परिणांमाचे वर्णन या अभंगात केले आहे. खरं तर कन्या माहेर आणि सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते. आपल्या चांगल्या वागण्याने सर्वांना समाधान देते. पतिव्रतेचे व्रत स्वीकारून जगात धन्य होते. भावंडीबाईंनी मुलीच्या जन्माचे श्रेष्ठत्व या अभंगात वर्णिले आहे. आजच्या वर्तमान काळातही हे प्रबोधन आवश्यक आहे. कारण मुलीबाबतची मानसिकता आजही समाजातून गेलेली नाही.


भावंडीबाईंचा जन्मकाळ इ. स. १८८८ चा. हा काळ आधुनिक आहे. पण त्यांची अभंगवाणी मात्र मध्ययुगीन विचारांचे प्रकटीकरण करणारी आहे. गुरूंनी तीन वर्षे परपुरुषाचे मुखावलोकन करू नये अशी अट घालून मंत्रदीक्षा दिली.


भावंडीबाई ही वैराग्यशील. तिने ही अट काटेकोरपणे पाळली. तिचा भाऊही पतिव्रत्याबाबत तिच्यावर संशय घेत असे. यावर इतर परकेजणांनी तिला किती छळले असेल याची कल्पनाही करवत नाही.


भावंडीबाईंनी सुमारे सातशे अभंगांची रचना केली आहे. त्या संत असल्या तरी प्रथम स्त्री आहेत. त्यात त्या विधवा आहेत. अध्यात्माच्या वाटेवर चालताना आयुष्याची झालेली परवड त्या कधी स्पष्टपणे तर कधी सुचकतेने व्यक्त करतात. म्हणूनच ‘स्त्री देह जीवा घडल्याकारणे| सदगुरू चरण अंतरले ||’
किंवा ‘स्त्री शरीराचा मना वाटे त्रास |
न घडे काही अभ्यास एक ||’
असे उद्गार त्यांच्या अभंगवाणीत येतात.

Comments
Add Comment

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत एका दिवशी पडणार दोन माळ, अष्टमी आणि नवमी तिथीबाबत जाणून घ्या

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची