शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई..सापळा रचून दोन युवक गजाआड

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर सणसवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन तरुण सणसवाडी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दामोदर होळकर, राकेश मळेकर आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने महामार्गालगतच्या एका दुकानासमोर सापळा रचला.यावेळी दोन संशयित युवक दुचाकीसह तिथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या या कारवाईत पुणे-नगर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले . युवकांकडून गांजाचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना गांजाच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींजवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि गांजाचा साठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''