मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र

मंडणगड :गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा व्हाईट वॉश देण्याकरिता मैदानात उतरलेल्या शिवसेनेसमोर तालुक्यात चार पक्षांची झालेली महाआघाडी मोठे आव्हान उभे करणार असे वाटत आहे. भाजप व काँग्रेस या पक्षाचे निवडणुकांमधील स्वतंत्र अस्तित्व व महाआघाडीतील राष्ट्रवादी व उबाठा या दोन प्रमुख पक्षांची जागा वाटपाची धुसफूस कोणाच्या पथ्यावर पडणार याबद्दल तालुक्यात अंदाज बांधणे सुरु झाले आहे.


महायुतीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने सेनेच्या विरोधात असलेल्या सर्व मतप्रवाहांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना पूर्णपणे यश आले नाही. अगदी महाआघाडीची घोषणा करुनही भिंगळोली पंचायत समिती गणात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे या संर्घषाला मैत्रीपूर्ण लढतीचे गोंडस रुप देत या गणात दोन्ही पक्षांनी उमेदवार अधिकृतपणे उतरवले आहेत. भिंगळोली जिल्हा परिषद गटाचा विचार करता शिवसेना, उबाठा,काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे व अस्मिता केंद्रे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. बाणकोट जिल्हा परिषद गटांचे निवडणुकांचा विचार करता या गटात शिवसेना,राष्ट्रवादी,बसपा अशी तिरंगी लढत होत आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांची अनेक वर्षांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागली.


पंचायत समिती गणाचा विचार करता इस्लामपूर पंचायत समिती गणात उबाठा, भाजप, शिवसेना अशी तिरंगी लढत होणार आहे. या लढतीत माजी सभापती प्रणाली चिले यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिंगळोली पंचायत समिती गणात शिवसेना, राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार आहे. या गणात राष्ट्रवादी व उबाठा यांची उमेदवारी असतानाही दोघांनीही स्वतंत्रपणे उमेदवार उतरवले. मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. बाणकोट पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे आहे. तुळशी पंचायत समिती गणात शिवसेना, भाजप, वंचीत, शिवसेना उबाठा अशी चौरंगी लढत होणार असल्याने ती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील 7 ठिकाणी चक्रीवादळाची रंगीत तालीम; आपत्ती यंत्रणांची तयारी तपासली

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन

Sindhudurg Drought : सिंधुदुर्गात दुष्काळाची स्थिती गंभीर; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार- मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग: दरवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 20 ते 25 टक्के पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये

Nitesh Rane : पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली! भातशेतीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग: राज्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकरी

Nitesh Rane : दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना तातडीने मदत द्या; मंत्री नितेश राणे यांचे अधिकारी व प्रशासनाला निर्देश

सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या

Nitesh Rane : 'भारताला महासत्ता बनवण्याच्या प्रवासात सिंधुदुर्गचे योगदान मोलाचे असेल'

स्वातंत्र्यदिनी १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत घालून दिला नवा आदर्श मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि

Nitesh Rane : फळपीक विम्यातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करा

- मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा मुंबई :