Nitesh Rane : पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली! भातशेतीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग: राज्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवार, दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या महत्त्वपूर्ण दौऱ्यात ते जिल्ह्यातील भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेणार आहेत.(Nitesh Rane Sindhudurg visit)



दौऱ्याचे नियोजन व वेळापत्रक




  • सकाळी 10:30 वाजता: सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे प्रत्यक्ष भातशेती पीक परिस्थितीची पाहणी.




  • सकाळी 11:00 वाजता: वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे जाऊन भातशेतीच्या स्थितीचा आढावा.




  • दुपारी 12:00 वाजता: जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष आढावा बैठकीस उपस्थिती.




  • दुपारी 3:30 वाजता: कणकवली तालुक्यातील बेळणेखुर्द येथे भातशेती पाहणी.(Nitesh Rane Sindhudurg visit)




  • सायंकाळी 4:30 वाजता: देवगड तालुक्यातील शिरगाव, शेवरे तांबळवाडी येथे शेतशिवाराला भेट.




  • सायंकाळी 5:30 वाजता: वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे पीक परिस्थितीची पाहणी.





शेतकऱ्यांशी थेट संवाद आणि प्रशासनाला निर्देश


या दौर्यात पालकमंत्री नितेश राणे हे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पिकांच्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना व मदतीबाबत ते या बैठकीत आणि पाहणी दौऱ्यात महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहेत. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या जिल्ह्यातील बळीराज्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.(Nitesh Rane Sindhudurg visit)

Comments
Add Comment

Noida Bus Fire : ‘आई खाली उतरेपर्यंत मी बाहेर पडणार नाही’, शशांकने अखेरपर्यंत सोडली नाही आईची साथ; नोएडा बस दुर्घटनेतील शशांकची हृदयद्रावक कहाणी

Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर जेवरजवळ बुधवारी रात्री खासगी एसी स्लीपर बसला भीषण आग लागून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला.

Asian Games 2026 : इराणला धूळ चारत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतासाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि सुवर्णमय बातमी समोर आली आहे. भारताच्या

India Pakistan UN : 'रात्री दहशतवाद, दिवसा सुरक्षेचा उपदेश करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,' UN मध्ये भारताचे सडेतोड प्रत्युत्तर

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू, चार मजली इमारतीवरून उडी ; आश्रमात खळबळ

वृंदावन (उत्तर प्रदेश) : मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक कुमार उर्फ ‘रसिक दुलारी सरन’ यांचा

ST Bus NCMC Card : ज्येष्ठ नागरिक-महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! १ ऑक्टोबरपासून ST बसच्या सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST Bus NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक,

Nitesh Rane : शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणे छत्रपती संभाजीनगर-जालना दौऱ्यावर

Mumbai : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त मच्छीमार बांधव आणि