सॅमसंगकडून गॅलेक्‍सी A07 5G चे अनावरण: फोटोग्राफी व बॅटरी पॉवरहाऊस

मुंबई : सॅमसंग हा भारतातील आघाडीचा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड फेब्रुवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यात गॅलेक्‍सी A07 5G लाँच करणार आहे. ए सिरीजमधील हा नवीन स्‍मार्टफोन भारतातील डिजिटलप्रेमींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जे ऑनलाइन मनोरंजन, सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून व्हिज्‍युअल कथाकथनाचा आनंद देणारा आणि दिवसभर बॅटरी कार्यरत राहणारा किफायतशीर दरामधील डिवाईसचा शोध घेत आहेत.


गॅलेक्‍सी A07 5G मध्‍ये आयकॉनिक ट्रॅक कॅमेरा डेकोसह हाय-रिझॉल्‍यूशन ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्‍यामध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या फोटोसाठी ५० मेगापिक्‍सल ऑटोफोकस कॅमेरा आणि अधिक सुस्‍पष्‍टतेसाठी २ मेगापिक्‍सल कॅमेरा आहे.


मेन कॅमेराचे एफ१.८ अर्पेचर, तसेच २ मेगापिक्‍सल डेप्‍थ कॅमेरा मूळ गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करत आणि पार्श्वभूमीला अस्‍पष्‍ट करत आकर्षक बोकेह इफेक्‍ट पोर्ट्रेट्स देतात. वाइड-अँगल सेटअप आकर्षक रंगसंगती व सुस्‍पष्‍टतेसाठी सुरेखरित्‍या डिझाइन करण्‍यात आले आहे, जे सूर्यास्‍त, रस्‍त्‍यावरील आकर्षक दृश्‍ये किंवा संस्‍मरणीय क्षणांना कॅप्‍चर करण्‍यासाठी अनुकूल आहे. या स्‍मार्टफोनमधील ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा किमान आवाजासह आकर्षक सेल्‍फीज व व्हिडिओ कॅप्‍चर होण्‍याची खात्री देतो.


ग्राहकांना फोटो कॅप्‍चर, एडिट व शेअर करण्‍याचा अनुभव देण्‍यासाठी गॅलेक्‍सी A07 5G मध्‍ये ६.७-इंच एफडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्टझ रिफ्रेश रेट आहे, ज्‍यामधून व्हिडिओ व वेब ब्राऊजिंगसाठी सहज ट्रान्झिशन्‍स व स्‍क्रॉलिंगची खात्री मिळते. डिस्‍प्‍लेचा हाय-ब्राइटनेस मोड (एचबीएम) ८०० नीट्सपर्यंत पोहोचत प्रखर सूर्यप्रकाशात देखील डिस्‍प्‍ले सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देतो. अधिक टिकाऊपणासाठी स्क्रिन २-स्‍टेप टेम्‍पर्ड ग्‍लासच्‍या माध्‍यमातून सुरक्षित आहे.


गॅलेक्‍सी A07 5G मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी पूर्वीच्‍या डिवाईसच्‍या तुलनेत २० टक्‍के अधिक क्षमतेची आहे. या शक्तिशाली बॅटरीसह २५ वॅट फास्‍ट चार्जिंग डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री देते, ज्‍यासह दीर्घकाळापर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ स्‍ट्रीम करता येतात किंवा सोशल मीडिया ब्राऊज करता येते. गॅलेक्‍सी A07 5G मधील सानुकूल पॉवर मॅनेजमेंट काम व मनोरंजनासाठी विनासायास कार्यक्षमतेची खात्री देते.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Geyser Electricity Saving Tips: गीझरमुळे वाढतंय वीजबिल? तापमान आणि वापराच्या या सवयी बदला

Geyser Electricity Saving Tips: थंडीच्या दिवसांत गरम पाण्याशिवाय दिवसाची सुरुवात करणं कठीण असतं. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्री

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट