Accident News : कोंडाईबारी घाटात लालपरीचा भीषण अपघात, दोन कंटेनरमध्ये बसचा अक्षरशः चुराडा, १५ प्रवाशांचा जीव...

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात आज एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. विसरवाडी पोलीस चौकी परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभी असलेल्या नवापूर आगाराच्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसमधील चालक आणि वाहकासह एकूण १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



कंटेनरच्या धडकेत एसटी बसचा चक्काचूर अन्...


सुरत-धुळे महामार्गावर १ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. नवापूर आगाराची पुणे-नवापूर बस (MH 14 BT 1957) महामार्गावर उभी असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बस समोर असलेल्या ट्रक आणि मागचा कंटेनर यांच्यामध्ये अक्षरशः चिरडली गेली. समोरच्या ट्रकचा लोखंडी अँगल बसच्या केबिनमध्ये घुसल्याने बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित हे केबिनमध्ये अडकून पडले होते, तर वाहक संतोष बारसू सोंडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर चालकाला केबिनमधून सुखरूप बाहेर काढले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.



१५ प्रवाशांचा जीव...


जामनपाडा येथील मनोहर जयवंत गावित यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले. त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून गंभीर जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले. बसमध्ये एकूण १५ प्रवासी होते, ज्यात नवापूर, साक्री, सुरत आणि सटाणा येथील नागरिकांचा समावेश होता. सुदैवाने, या भीषण अपघातात बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. आपत्कालीन सेवांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

दुष्काळाबाबत महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय पथकासमोर सादरीकरण

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र

Sinhasth Kumbhmela: नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना वेग, त्र्यंबकेश्वर मंदिर 2 महिने राहणार बंद!

नाशिक: अवघ्या काही दिवसांवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि

जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल; १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे बावनकुळेंचे निर्देश

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांबाबत

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची केंद्रीय पथकांकडून पाहणी सुरू; ११ सदस्यांचे पथक राज्यात दाखल

मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११

दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांसाठी रेशन वितरणाचे निकष जाहीर

मुंबई : दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये आता अन्नधान्याच्या उपलब्धतेवर सरकारने लक्ष

Female Foeticide : लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या झाल्यास ‘मोका’ लागणार! हिवाळी अधिवेशनात होणार निर्णय

मुंबई : प्रसूतीपूर्व लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकरणांमध्ये संघटितपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि