Surya Grahan 2026: दुर्मीळ योग! माघ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; काय खावे आणि काय टाळावे?, जाणून घ्या...

मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. कंकणाकृती ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तर सूर्याची कडा अंगठीसारखा (रिंगसारखा) दिसते. याच दिवशी माघ महिन्यातील अमावस्या असल्याने ग्रहणाच्या वेळी अमावस्येची पूजा करता येईल का? याबद्दल जाणून घेऊयात...



सूर्यग्रहण २०२६ची वेळ



वर्षाचे पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३:२६ वाजता (IST) सुरू होईल आणि संध्याकाळी ७:५७ वाजता समाप्त होईल. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे ४ तास ३२ मिनिटांचा असेल. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही.



माघ अमावस्या आणि ग्रहणाचा योग



माघ अमावस्या १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५:३५ वाजता सुरू होईल आणि १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३१ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार अमावस्या १७ फेब्रुवारीलाच मानली जाईल. म्हणजेच अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी येत आहेत.



ग्रहणाच्या वेळी पूजा करू शकतो का?



धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा ग्रहण भारतात दृश्यमान असते तेव्हाच सूतक काळ लागू होतो. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे माघ अमावस्येच्या व्रताचे पालन करता येईल आणि पूजा-पाठही करता येईल. कोणत्याही शुभ कार्यात अडथळा मानला जाणार नाही.



माघ अमावस्येचे महत्त्व



अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित मानला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या दिवशी तर्पण अवश्य करावे. पितरांना संतुष्ट केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. रखडलेली कामेही पूर्ण होऊ लागतात, असे मानले जाते.



ग्रहणाच्या वेळी काय खावे, काय टाळावे?



सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, कोणत्याही ग्रहणाच्या काळात शिजवलेले अन्न, तामसिक पदार्थ जसे मांस, मासे, कांदा, लसूण आणि पचनास जड अन्नपदार्थ खाणे टाळावे, अशी मान्यता आहे. कारण हे पदार्थ अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतात, असे म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी ग्रहणाच्या वेळी उपवास करणे चांगले मानले जाते. काही खाणे आवश्यक असल्यास त्यात तुळशीपत्र ठेवावे आणि द्रवयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तसेच पचनास हलके आणि सात्त्विक अन्नाचे सेवन करावे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''