Bhigwan kidnapping girl video : भिगवण अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण; डोळ्यात तिखट टाकून पळवल्याचा बनाव, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल!

पुणे : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका 'अपहरण' नाट्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. लग्नाची खरेदी करण्यासाठी आई आणि भावासोबत गेलेल्या एका तरुणीचे दोन तरुणांनी डोळ्यात तिखट टाकून अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवताच या प्रकरणाचे सत्य समोर आले असून, हे अपहरण नसून प्रेमप्रकरणातून (Lovestory) तरुणी स्वेच्छेने गेल्याचे स्पष्ट झाले आहे. भिगवण बाजारपेठेत तरुणीच्या आई आणि भावावर हल्ला करून, त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तरुणीला बळजबरीने नेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते आणि पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधकार्य सुरू केले होते. मात्र, पोलीस तपासात मुलगा आणि मुलगी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आणि त्यांच्यात मेसेजद्वारे बोलणे होत असल्याचे पुरावे समोर आले. घटनेला खरा ट्विस्ट तेव्हा मिळाला जेव्हा संबंधित तरुणीने स्वतः एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. "माझे कुणीही अपहरण केलेले नाही, माझे संबंधित मुलावर प्रेम असून मी माझ्या स्वमर्जीने घर सोडून त्याच्यासोबत आले आहे," असे स्पष्टीकरण तिने या व्हिडिओतून दिले. यावर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, दोघांमध्ये आधीपासूनच संवाद होता आणि तांत्रिक तपासातूनही ही बाब स्पष्ट झाली आहे.



दीड महिन्यात ११ वेळा संपर्क, तरुणी म्हणते- "मी स्वमर्जीने आले!"


भिगवण येथील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला आता तांत्रिक तपासाने पूर्णपणे वेगळे वळण दिले आहे. "माझे संबंधित तरुणाशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून मी कोणत्याही दबावाखाली नाही, तर माझ्या स्वमर्जीने त्याच्यासोबत आले आहे," असा खळबळजनक खुलासा तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती लागलेल्या कॉल डिटेल्स (CDR) मधून या प्रेमप्रकरणाच्या नियोजित कटावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यात मुलगा आणि मुलगी यांच्यात एकूण ११ वेळा संपर्क झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये मुलीनेच पुढाकार घेत ८ वेळा मुलाला एसएमएस (SMS) केले होते. आरोपी तरुणाने मुलीला केलेले ३ कॉल्स हे मध्यरात्री उशिराचे असून त्यांचे कालावधी अवघ्या ३ ते ५ सेकंदांचे आहेत. हे कॉल्स केवळ 'सिग्नल' म्हणून वापरले गेले असावेत आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यात दीर्घकाळ 'व्हॉट्सॲप कॉल'वर चर्चा व्हायची, असा संशय पोलिसांना आहे. आता पोलीस या व्हॉट्सॲप चॅटचे डिटेल्स मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मुलीने स्वतः व्हिडिओ प्रसिद्ध करून अपहरणाचा दावा फेटाळला असला, तरी पोलीस अद्याप या दोघांच्याही शोधात आहेत. तांत्रिक तपासावरून हे प्रकरण आधीपासूनच ठरवलेले (Pre-planned) असल्याचे स्पष्ट होत आहे. डोळ्यात तिखट टाकण्याचा प्रकार हा केवळ दिशाभूल करण्यासाठीचा बनाव होता की काय, या दिशेनेही आता तपास सुरू झाला आहे. अद्याप हे दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, मात्र त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची