Pune Girl Kidnapping Case Update: पुणे अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; अपहरण झालेल्या मुलीचे अन् आरोपीचे...

पुणे: पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश मोर्चा आयोजित केला. तसेच भिगवण बंदची हाकही देण्यात आली आहे. एकीकडे अपहरण प्रकरणाने मोठा तणाव पाहायला मिळत असतानाच पोलिसांच्या तपासातून अपहरण करणारे आरोपी आणि तरुणीचे खळबळजनक कनेक्शन समोर आले आहे.



नेमकं प्रकरण काय?



पुण्यातील भिगवणमधून मंगळवारी दुपारी एका २१ वर्षीय तरुणीचे दोन तरुणांनी अपहरण केले. मुलगी आई आणि भावासोबत बाजारात आली असतानाच डोळ्यात चटणी टाकून तिला पळवण्यात आले. याप्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. पिडीत मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेप्रकरणी जहीर हारुन शेख आणि आयन हारुन शेख या दोघांविरोधात भिगवण पोलिसात अपहरणाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजाशेजारी आहे. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणे सुरु होते. ते वेगवेगळ्या धर्माचे असले तरी त्यांची बालपणापासूनची ओळख आहे. त्यांचे कॉल तसेच टेक्स्ट मेसेज हाती लागले आहेत. पोलिसांनी दोघांचेही फक्त एक महिन्याचे डिटेल मागवले होते. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी १६५ किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.


याप्रकरणात कोणीही चुकीच्या गोष्टी करु नये. कोणत्याही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत. या सर्व प्रकरणाचे सत्य समोर येईल, पोलीस त्याचा तपास करणार आहेत. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''