Gold Silver Price: सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; २२ आणि २४ कॅरेटचे दर तपासा

मुंबई: गेल्या दोन दिवस शांत बसलेल्या सोन्याने आज पुन्हा एकदा जोरात गती पकडली असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय वायदा बाजारात (MCX) सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ३३८ रुपयांची वाढ झाली असून, तो आता १,५२,७५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. केवळ सोन्यानेच नाही, तर चांदीनेही आज मोठी भरारी घेत गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.


जागतिक बाजारात जरी काही प्रमाणात घसरण दिसत असली, तरी भारतीय बाजारपेठेत चित्र पूर्णपणे वेगळं असल्याचे दिसत आहे. अमेरिकन डॉलरचा निर्देशांक वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने खरेदी महागली आहे. चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामध्ये लूनर न्यू इयरच्या सुट्ट्यांमुळे व्यवहार थंडावले आहेत, ज्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे. चांदीच्या किमतीत गेल्या तीन दिवसांत किलोमागे १५ हजारांची घसरण झाली होती, पण आज पुन्हा ४,६६६ रुपयांच्या वाढीसह चांदी २,३३,४४९ रुपयांवर व्यवहार करत आहे.



सोन्याचे दर


२४ कॅरेट: १,५५,५२१ रुपये
२२ कॅरेट: १,४२,५८२ रुपये
१८ कॅरेट: १,१६,६४० रुपये



शहरानुसार सोन्याचे दर


मुंबई- १,५४,१९०
दिल्ली- १,५४,३४०
पुणे / बेंगळुरू- १,५४,१९०


चांदीच्या बाबतीत आज चेन्नईने देशात बाजी मारली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात असताना, चेन्नईमध्ये हाच दर २,६४,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल आणि महागाईची नवी आकडेवारी समोर येत नाही, तोपर्यंत बाजारात अशीच 'धडधड' सुरू राहील. त्यामुळे जर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर थोडे दिवस थांबून बाजाराचा कल पाहणं फायद्याचं ठरू शकतं.

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच