Bhigwan Crime : "तो व्हिडिओ म्हणजे दबावाचा खेळ!"; आमदार गोपीचंद पडळकरांचा भिगवण अपहरण प्रकरणात खळबळजनक आरोप

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये मंगळवारी भरदिवसा एका तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्गावर 'रास्ता रोको' करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, या गुंतागुंतीच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, आपले अपहरण झाले नसून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा व्हिडिओ संबंधित तरुणीकडून दहशतीच्या जोरावर किंवा जबरदस्तीने बनवून घेतल्याचा खळबळजनक आरोप पडळकर यांनी केला आहे. यामुळे हे प्रकरण आता केवळ प्रेमप्रकरण नसून राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे केंद्र बनले आहे. पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून व्हिडिओचे सत्य शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.



मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास थरारक अपहरणाची घटना घडली. २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात असताना, जहीर शेख आणि अयान शेख यांनी त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अमानुषपणाचा कळस गाठत आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याच गोंधळाचा फायदा घेत त्यांनी तरुणीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत कोंबून पळवून नेले. या घटनेचे पडसाद भिगवण परिसरात उमटले असून, संतप्त नागरिकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला. आरोपींना तात्काळ बेड्या ठोकण्याच्या मागणीसाठी आज 'भिगवण बंद' पाळण्यात येत असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



तरुणीच्या व्हिडिओत मोठा ट्विस्ट


भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एका प्रेमसंबंधाचा (Love Story) पदर असल्याचे समोर आले आहे. ज्या जहीर शेखवर अपहरणाचा आरोप करण्यात आला होता, त्याच्यासोबत आपण स्वमर्जीने गेल्याचा दावा संबंधित तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. "आमचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून, माझे अपहरण झालेले नाही. माझ्या डोळ्यात चटणी किंवा तिखट टाकण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही," असे सांगत तिने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांनी केलेले अपहरणाचे दावे चुकीचे असून, आपण कोणत्याही दबावाशिवाय घराबाहेर पडलो आहोत, असेही तिने स्पष्ट केले. या खुलाशामुळे एकीकडे पोलिसांवरील तणाव कमी झाला असला, तरी या प्रेमप्रकरणाच्या दाव्यामुळे स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या आंदोलनाचा पेच अधिकच वाढला आहे.



पोलीस तपासात धक्कादायक माहिती


अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासात मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड महिन्यात दोघांमध्ये ११ वेळा संपर्क झाला होता. यामध्ये मुलीने ८ वेळा एसएमएस केले होते, तर मुलाने मध्यरात्री कॉल केले होते. हे कॉल्स अवघ्या काही सेकंदांचे असून त्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांचे संभाषण सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.



पडळकरांनी उघडलं भिगवण प्रकरणाचं 'क्राइम' कनेक्शन


दरम्यान, आता राजकीय वळण घेतले असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांच्या तपासावर आणि त्या व्हिडिओवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "पुढच्या दोन-चार दिवसात ज्या मुलीचे लग्न आहे, ती मुलगी अचानक मर्जीने कशी जाईल? हा व्हिडिओ तिच्याकडून धाक दाखवून जबरदस्तीने बनवून घेण्यात आला आहे," असा संशय पडळकर यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ पाठवण्यासाठी लोकेशन लपवणाऱ्या विशेष तंत्रज्ञानाचा (ॲपचा) वापर करण्यात आल्याने यामागे मोठे रॅकेट असल्याचा दावाही त्यांनी केला. आरोपींचे नातेवाईक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांना वाचवण्यासाठी राजकीय किंवा गुंडगिरीचा वरदहस्त असल्याचा आरोप करत पडळकर यांनी 'भिगवण पोलीस ठाण्या'वर धडक देण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा