Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका युवकाच्या जीवावर बेतले आहे. पकडलेल्या सापाने दंश केल्यामुळे येथील ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित तरुण सापसोबत मस्ती करताना दिसत आहे.


सापाची छेड काढणे आणि विनाकारण त्याच्याशी खेळणे हे अनेक सर्पमित्रांच्या आणि नागरिकांच्या जीवावर घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत .अशीच एक घटना विरार पश्चिम मध्ये घडली आहे. एका व्यक्तीने सापासोबत केलेली मस्ती त्यांच्या अंगलट आली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


विरार पश्चिमेच्या नवापूर येथील भागात साप आला होता. याच वेळी मद्याच्या नशेत असलेल्या एका तरुणाने त्याला पकडले. व त्यांच्या सोबत मस्ती सुरू केली होती.या सापासोबतचा हा स्टंट त्याला भलताच भारी पडला.सदर युवक सापासोबत मस्ती करीत असताना याच सापाने त्याला दंश केला. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.राजू चंदू बरड (४०) असे या मयत तरुणाचे नाव आहे. साप गळ्यात घेऊन फिरत असताना त्याच्या हाताला दंश केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''