Budget Session : डहाणूतील 'त्या' प्रकरणावर विधानपरिषदेत पडसाद; दोषी डॉक्टरांचे निलंबन

- आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक सक्तीचे होणार!


मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थितीत परिचारिकेने प्रसूती केल्याच्या गंभीर प्रकरणाचे पडसाद आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत उमटले. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महिला व बालविकास मंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित दोषी आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.


चित्रा वाघ यांनी चर्चेला सुरुवात करताना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. "योजना आहेत, निधी आहे, मग शेवटच्या टप्प्यावर महिलांना सुविधा का मिळत नाहीत?" असा सवाल त्यांनी केला. डहाणूच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील आरोग्य केंद्रांच्या सखोल पुनरावलोकनाची मागणी केली. तसेच, दुर्गम भागात डॉक्टरांनी सेवा द्यावी यासाठी शासनाचे काय धोरण आहे आणि बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करणार का, असे रोखठोक प्रश्न त्यांनी विचारले.


यावर आमदार चित्रा वाघ यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, डहाणूतील घटना अत्यंत खेदजनक असून शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित आरोग्य अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे, तर कंत्राटी तत्त्वावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांची सेवा खंडित (Termination) करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आता बायोमेट्रिक प्रणाली सक्तीची करण्यात आली असून, याद्वारे नियमित संनियंत्रण (Monitoring) केले जात आहे. 'आयुष्मान भारत' आणि 'लक्ष्य' (LaQshya) कार्यक्रमांतर्गत राज्यातील लेबर रूम आणि प्रसूती कक्षांच्या गुणवत्तेवर भर दिला जात आहे. पालघरमधील ४६ पैकी १२ आरोग्य केंद्रे राष्ट्रीय स्तरावर प्रमाणित झाली असून, उर्वरित केंद्रेही या वर्षात सुधारली जातील, असे त्यांनी आश्वासित केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''