श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र


कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम साधणारा ऐतिहासिक क्षण टिटवाळ्याने अनुभवला. टिटवाळा–रुंदे मार्गालगतच्या विस्तीर्ण पटांगणात ‘निसर्गायण’ या महत्त्वाकांक्षी पर्यावरण शिक्षण प्रकल्पाचे भूमिपूजन कडोंमपाच्या महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते पार पडले.


धार्मिक ओळखीच्या या नगरीत हरित भविष्याचा ठोस संकल्प रुजला. श्री सिद्धीविनायक मंदिर, टिटवाळाच्या परिसरात उभा राहणारा हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची शास्त्रशुद्ध, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन चळवळ उभारण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हीजल, ठाणे यांच्या संयुक्त पुढाकारातून साकार होत असलेल्या या प्रकल्पाला प्रशासनाची भक्कम साथ लाभली.


आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात निसर्गातील गुंतवणूक ही इतर कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारी ठरते, असे स्पष्ट करत या परिसरातून भविष्यात २०० ते २५० कोटी रुपयांच्या मूल्याइतका पर्यावरणीय आणि पर्यटनात्मक लाभ निर्माण होऊ शकतो, असे उदाहरणासहित मांडले. टिटवाळ्यातील गणपती मंदिर आणि नव्याने उभारला जाणारा हा हरित प्रकल्प यांना पर्यटनदृष्ट्या एकत्रितपणे विकसित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला. महापौर हर्षली चौधरी यांनीही पर्यटनाच्या दृष्टीने या उपक्रमाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची घोषणा करत ‘निसर्गायण’ला शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Geyser Electricity Saving Tips: गीझरमुळे वाढतंय वीजबिल? तापमान आणि वापराच्या या सवयी बदला

Geyser Electricity Saving Tips: थंडीच्या दिवसांत गरम पाण्याशिवाय दिवसाची सुरुवात करणं कठीण असतं. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्री

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

EPFO New Rules: पीएफ खाते बंद झालं तरी पैसे सुरक्षित! वयाच्या 58 वर्षांपर्यंत व्याज मिळण्याचा नियम काय?

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे

मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपालांची हजेरी! विविध पुस्तक दालनांची पाहणी; पुस्तकांचीही केली खरेदी

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट