वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त


विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती तसेच विषय समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत स्वीकृत सदस्यांची निवडसुद्धा झाली असून, अर्थसंकल्पही सादर झालेला आहे. वसई-विरारमध्ये मात्र ही सर्व प्रक्रिया संथगतीने सुरू असून, स्थायी समिती सभापती नसल्याने यावर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निघणार आहे.


वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड २० फेब्रुवारी रोजी महासभेत करण्यात आली आहे. आता याच सदस्यांमधून स्थायी समिती सभापती निवडले जाणार आहेत. यासाठी ५ मार्च रोजी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लावण्यात आला आहे. पालिकेत बहुजन विकास आघाडीकडे स्थायी समितीत १० सदस्य असून, भाजपकडे ६ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती पदावर बहुजन विकास आघाडीच्याच सदस्यांची वर्णी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्तांकडून स्थायी समिती सभापती यांना सादर केला जातो. मात्र वसई-विरार महापालिकेत स्थायी समितीचे सभापती अद्याप निवडले गेले नाहीत.त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही. ५ मार्च रोजी नवे सभापती निवडले जाणार असल्याने ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे.


गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रशासकीय काळात सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ३ हजार ९२६ कोटी रुपयांचा होता. मालमत्ता कर, पाणीपट्टी यामध्ये वाढ करण्यासह पाणीपुरवठा लाभ कर आणि मल सुविधा लाभ कर तसेच सिसी प्रमाणपत्र घेतलेल्या आणि ओसी प्रमाणपत्र न घेतलेल्या विकासकांकडून दंड म्हणून वसूल करणे अशा प्रकारे पालिकेचे उत्पन्न वाढविण्याची योजना प्रशासनाने आखली होती. मात्र उपरोक्त बाबींपैकी एकही निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकले नाही. त्यामुळे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच सर्व विभागाचा खर्च ३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने परिस्थिती "जैसे थे" अशीच असल्याने यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत ७००/८०० कोटी रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीनंतर म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.



स्वीकृत सदस्य पदासाठी प्रतीक्षा :


महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेता या सर्वांच्या निवडीनंतर सर्वच महापालिकेत स्वीकृत सदस्य पदाची उत्सुकता असते. मुंबईसह काही महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य निवडल्या गेले आहेत. वसई-विरारमध्ये मात्र याबाबत सुद्धा प्रशासकीय स्तरावरून काहीही हालचाल झालेली नाही. सदस्य संख्याबळानुसार बहुजन विकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी दोन्ही राजकीय पक्षांमध्ये चांगलीच स्पर्धा आहे. दरम्यान, परिवहन समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, वैद्यकीय आरोग्य सहाय्य समिती या समित्यांचे गठन सुद्धा अद्याप झालेले नसून त्यांचे सभापती देखील निवडले गेलेले नाहीत. त्याचप्रमाणे नऊ झोन सभापतीची निवडदेखील करावी लागणार आहे. या प्रक्रियेकडे सुद्धा दोन्ही राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे आणि प्रशासकीय स्तरावर मात्र याबाबत काहीही हालचाली नाहीत.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''