आणखी एका न्यायालयीन लढाईत धनंजय मुंडेंचा विजय; लोकायुक्तांचा निकालही धनंजय मुंडेंच्या बाजूने!

अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळून


कृषी साहित्य खरेदीबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल स्वयंस्पष्ट; लोकायुक्तांचे निरीक्षण


कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिटसह दमानियांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले


तोंडाच्या वाफा काढत मुंडेंची बदनामी करणाऱ्या अंजली दमानियांना उच्च न्यायालयापाठोपाठ लोकायुक्तांकडून चपराक


धनंजय मुंडेंवर लावलेले सर्व आरोप न्यायव्यस्थेपुढे ठरले खोटे


मुंबई - राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत.


धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले, त्यामध्ये अनियमितता करून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला व संबंधितांचे आरोप फेटाळून लावल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज्य लोक आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती.


लोकायुक्त यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे संपूर्णतः ऐकून घेऊन, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकाल तसेच संविधानिक तरतुदींचा अभ्यास करून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा स्वयंस्पष्ट असून या प्रकरणातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून सदर आरोप फेटाळून लावत असल्याचे आपल्या निकालामध्ये स्पष्ट केले आहे.


उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पडगिलवार यांच्यासह विविध जनहित याचिका यांच्यावरती एकत्रित निकाल देताना हे आरोप केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून व खोट्या पुराव्यांच्या आधारे केलेले असून राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर व्यवसायिक दृष्टीने खोटी माहिती समोर आणून शंका उपस्थित करणे हे कायद्याला धरून नसल्याचे स्पष्ट करत, सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. तसेच याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.


त्यानंतर संबंधित याचिकाकर्त्यांना जर निकाल मान्य नसता तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विरोधात अपील करायला हवे होते मात्र त्यांनी अद्याप अपील न करता दंड भरला; याचाच अर्थ याचिका करते यांना सुद्धा उच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य होता.


उच्च न्यायालयाने या निकालामध्ये नोंदविलेली निरीक्षणे ही स्वयंस्पष्ट, निर्णायक व शासनाच्या धोरणाला अनुसरून असल्याने तसेच याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे संबंधित याचिकेमध्ये जोडलेल्या बाबींव्यतिरिक्त, बनावट पुरावे असून कुठलाही ठोस पुरावा किंवा दखल घेण्यायोग्य काहीही नसल्याने यामध्ये आणखी वेगळी सुनावणी घेण्याचा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही, असेही लोकायुक्तांनी आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.


कृषी साहित्य खरेदी सोबतच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ऑफिस प्रॉफिट सह विविध आरोप केले होते. यासंदर्भात धनंजय मुंडे यांचे वकील श्री शार्दुल सिंह यांनी धनंजय मुंडे यांची बाजू मांडताना खासदार जया बच्चन यांच्या संबंधातील सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा संदर्भ देत ऑफिस प्रॉफिट बाबत लोकायुक्तांकडे देण्यात आलेली माहिती ही चुकीची व अर्धवट असल्याचे नमूद केले. या प्रकरणात देखील संविधानातील ठराविक काही कलमे, लोकप्रतिनिधीत्व कायदा, लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास केला असून, लोक आयुक्तांच्या अखत्यारीतील कोणताही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा किंवा त्या अनुषंगाने कुठलाही आरोप सिद्ध होत नाही; तसेच याचिकाकर्ते अंजली दमानिया यांनी याबाबत देखील कुठलाही महत्त्वाचा नवीन पुरावा त्यांच्या पुरवणी जबाबात देखील सादर केलेला नाही. त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा हा देखील निकाली काढला असून, त्यातही धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.


दरम्यान मागील एका वर्षापासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जे काही आरोप केले ते उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आता लोकायुक्तांनी देखील सदर आरोप फेटाळून लावले असल्याने, अंजली दमानिया यांच्या केवळ तोंडाच्या वाफा व धनंजय मुंडे यांच्या बदनामीचा असफल प्रयत्न होता, हे सिद्ध झाले आहे, अंजली दमानिया यांना या निकालाने एकप्रकारे न्यायव्यवस्थेने एक प्रकारची चपराक लावली आहे, असे म्हणावे लागेल.


दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावरती मागील काही महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आरोप करण्यात आले, त्यावरून त्यांची बदनामी करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही, मात्र मुंडे यांच्या विरोधातील एक एक आरोप खोटा सिद्ध होण्याची मालिका देखील सुरू असून आज त्यात या निकालाने महत्वाची भर पडली आहे.


महत्त्वाचे निकाल




  • कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीबाबत करण्यात आलेल्या आरोपात उच्च न्यायालय त्यापाठोपाठ आता लोकायुक्त यांनी देखील मुंडेंच्या बाजूने निकाल दिला.

  • पीकविमा संदर्भात कोणताही घोटाळा झाला नसून राज्यात मागील दहा वर्षातील सर्वाधिक पीकविमा धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री कार्यकाळात महाराष्ट्राला मिळाला, असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषित केले.

  • धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथ पत्रात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपातून क्लीन चीट, मुंडेंच्या बाजूने निकाल.

  • ऑफिस ऑफ प्रॉफिट संदर्भाने केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण