मेटाचे नवीन अॅण्‍टी-स्कॅम टूल्‍स लाँच

मेटाने व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरवर नवीन अॅण्‍टी-स्कॅम वैशिष्‍ट्यांच्‍या लाँचची घोषणा केली आहे. ही वैशिष्‍ट्ये संशयास्पद कृतींमध्ये गुंतण्यापूर्वी व्‍यक्तींना सावध करण्यासाठी आणि त्‍यांचे फसवणूकीपासून संरक्षण करण्‍यासाठी सादर करण्यात आली आहेत. या नवीन अॅण्‍टी-स्कॅम टूल्समध्ये व्हॉट्सअॅप (WhatsApp)वर डिवाइस लिंकिंग वॉर्निंग, फेसबुकवर संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टबद्दलचे अलर्ट आणि मेसेंजर (Messenger)वर प्रगत स्कॅम डिटेक्शन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.


१. व्‍हॉट्सअॅप डिवाईस लिंकिंग वॉर्निंग: वर्तणूकीशी संबंधित संकेतांवरून लिंकिंग रिक्वेस्ट संशयास्पद वाटली तर व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांना सावध करेल. स्कॅमर्स अनेकदा व्‍यक्तींना फसवून त्यांचे व्हॉट्सअॅप खाते दुसऱ्या डिवाईसशी जोडण्यास किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्‍न करतात. हे अलर्ट्स वापरकर्त्यांना ही विनंती नेमकी कुठून येत आहे याची माहिती देतील आणि तो एक स्कॅम (फसवणूक) असू शकतो, अशी स्पष्ट चेतावणी देतील. यामुळे लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी व्‍यक्तींना थांबून विचार करण्याची संधी मिळेल.


२. संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टसाठी फेसबुक अलर्ट: मेटा सध्या फेसबुकवर नवीन चेतावणी वैशिष्‍ट्याची चाचणी घेत आहे. तुम्ही एखाद्या संशयास्पद क्रियाकलाप दाखवणाऱ्या अकाऊंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता किंवा अशा अकाऊंटकडून रिक्वेस्ट येते तेव्‍हा तुम्‍हाला चेतावणी दिली जाईल. यामध्ये तुमचे फारसे ओळखीचे मित्र नसलेले किंवा प्रोफाइलवर वेगळ्या देशाचे लोकेशन दिसणारे अकाऊंट्स असू शकतात. हा अलर्ट व्‍यक्तींना अशा संशयास्पद रिक्वेस्ट ब्लॉक किंवा नाकारण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल.


३. मेसेंजरवर प्रगत स्कॅम डिटेक्शनचा विस्तार: मेसेंजरवरील संभाषणामध्ये बनावट नोकरीच्या ऑफर सारख्‍या फसवणुकीच्या सामान्य पद्धती दिसून येतील, तेव्हा वापरकर्त्यांना चेतावणी मिळेल आणि त्यांना ते मेसेज एआय रिव्ह्यूसाठी पाठवण्याचा पर्याय दिला जाईल. तो मेसेज स्कॅम म्हणून चिन्हांकित झाला, तर व्‍यक्तींना ते संशयास्पद अकाऊंट ब्लॉक किंवा तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.


उत्‍पादनांना अपडेट करण्‍याव्‍यतिरिक्त मेटा व्‍यक्ती आणि व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी फसवणूक करणाऱ्या क्रियाकलापांविरोधात आक्रमकपणे लढा देत आहे. गेल्या वर्षात मेटाने १५९ दशलक्षहून अधिक फसवणूक करणाऱ्या जाहिराती हटवल्या आहेत, ज्यापैकी ९२ टक्‍के जाहिराती कोणीही तक्रार करण्यापूर्वी काढून टाकण्यात आल्या होत्या. २०२५ मध्ये, भारतात कंपनीने फसवणूक, स्कॅम आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतींविरुद्धच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल १२.१ दशलक्षहून अधिक जाहिरातींवर बंदी घातली, ज्यापैकी ९३ टक्‍क्यांपेक्षा जास्त जाहिराती लगेचच हटवण्यात आल्या होत्या.


फसवणुकीचा सामना करण्यासाठी फक्त तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी पुरेशी नाही, तर त्यासाठी विशेषत: असुरक्षित व्‍यक्तींना शिक्षण देण्‍यासह त्‍यांच्‍यामध्‍ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मेटाने इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (आय४सी) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (SEBI) यांच्या सहयोगाने त्यांच्या 'स्कॅम से बचो' (Scam Se Bacho) या प्रमुख मोहिमेचे तिसरे एडिशन लाँच केले. वर्षभर चाललेल्या या मोहिमेमध्ये प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री नीना गुप्‍ता आणि आघाडीचे डिजिटल क्रिएटर्स यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचा व्‍यक्तींना ऑनलाइन फसवणुकांच्‍या पद्धती ओळखून त्‍या टाळण्‍यास मदत करण्‍याचा उद्देश होता.

Comments
Add Comment

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदी स्वस्त ! सलग तिसऱ्या दिवशी दर घसरले, पाहा आजचे भाव

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. बुधवारी

Share Market News: इन्वेस्टर्ससाठी आनंदाची बातमी, सेन्सेक्स तब्बल 1109 अंकांनी वधारला; आयटी शेअर्सची तुफान फटकेबाजी

मुंबई: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी अभूतपूर्व तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1109.10 अंकांनी

Gold Rate Today : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

Gold Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी

मृत्युपत्र कसे बनवावे? का आहे महत्त्वाचे आणि त्यासाठी किती खर्च येतो, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर आपल्या पश्चात कुटुंबात मालमत्तेवरून वाद होऊ नयेत, असे वाटत असेल तर 'मृत्युपत्र' हा

RBI Repo Rate: आरबीआयने रेपो रेट केला जाहीर, नेमकं काय आहे? जाणून घ्या

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पतधोरण