Dhurandhar 2 : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पण, यादरम्यान काही नेटकरी सोशल मिडियावर एआयद्वारे बनावट व्हिडीओ बनवून ते तूफान व्हायरल करत आहेत. अशातच एका वादग्रस्त व्हिडीओवर दिग्दर्शक आदित्य धर संतपला असून आदित्यनं याबाबत कठोर कारवाई करण्याचा इशारा नेटकऱ्यांना दिला आहे. आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत आदित्य धरनं याबाबत संताप व्यक्त केला आहे.


आपल्या पोस्टमध्ये आदित्यनं म्हटंलयं की देशभरात आणि जगभरात धुरंधर: द रिव्हेंज या सिनेमाला जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या प्रेमाचा मी कायम ऋणी असेन. पंरतु काहीजण अधिकृतरित्या प्रदर्शित झालेल्या प्रमोशनल मटेरियलला मॉर्फ करून फसवणूक करणारे व्हिडीओ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवत आहेत. ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली असून अशाच एका बनावट/खोट्या फोटोमध्ये हमजा/जसकीरतला पगडी बांधताना ध्रूमपान करताना खोटेपणानं दाखवलं आहे. हे अजिबात सत्य नाही आणि आमच्या सिनेमात किंवा कोणत्याही अधिकृत मटेरिअलमध्ये असं दृश्य नाही. असं दिग्दर्शक आदित्य धरने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.


'लोकांना भडवण्यासाठी आणि खोडसाळपणा करण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार करण्याला आला आहे. शीख समाजासाठी माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि सिनेमातील प्रत्येक भूमिका, दृश्य, सादरीकरण अत्यंत संवेदेनशीलपणे, आदरपूर्वक आणि जबाबदारीने चित्रित करण्यात आलं आहे. या बनावट कंटेंटद्वारे चुकीची माहिती पसरवणं हा अप्रामाणिकपणा आणि दुर्भावनापूर्ण आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी अधिकृत कंटेटवरच विश्वास ठेवावा आणि त्या हेतूनेच सिनेमा पाहावा. चुकीच्या हेतूने पसरवल्या जाणाऱ्या एआय जनरेटेड कंटेटला बळी पडू नये. अशा गोष्टींवर कडक कारवाई करण्यात येईल'. अशा शब्दात आदित्यने संताप व्यक्त केला आहे.





सोशल मिडीयावर याआधीही धुरंधर २ सिनेमाच्या शेवटच्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जसकीरत आपल्या कुटुंबीयांची आनदानं भेट घेतो. मात्र, प्रत्यक्षात सिनेमाचा शेवट असा दाखवण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'