Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला हनुमान यांचा जन्म झाला. हिंदू धर्मात हनुमान म्हणजेच बुद्धीच, सुदृढ आरोग्याचं दैवत आहे. हनुमान हे त्यांच्या भक्तांवर आलेलं संकत हरण करतात म्हणून त्यांना संकटमोचन असेही म्हटले जाते.पाहुयात यंदाची हनुमान जयंती ही नेमकी कधी आहे? आणि जाणून घेऊयात योग्य शुभ मुहूर्त आणि तिथी.



हनुमान जयंती तिथी


हिंदू पंचांगानुसार, यंदा चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 07.07 वाजता सुरू होऊन 2 एप्रिलच्या सकाळी 07.42 वाजेपर्यंत समाप्त असेल. त्यामुळे उदया तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. भाविक या दिवशी उपवास आणि विधिवत पूजा करून हनुमानाचा आशीर्वाद घेऊ शकतात.



हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त


धार्मिक मान्यतेनुसार, शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने त्याचे लाभ अनेक पटींनी वाढतात. यावेळेस हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 6.10 वाजेपासून ते सकाळी 7.44 वाजेपर्यंत पूजेची उत्तम वेळ असेल.तसेच संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते संध्याकाळी 8.06 वाजेपर्यंत देखील पूजा करता येईल.


ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.38 वाजेपासून ते पहाटे 5.24 वाजेपर्यंत पर्यंत असेल.
अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 वाजेपासून ते दुपारी 12:50 वाजेपर्यंत राहील.



हनुमान जयंतीच्या दिवशीचा शुभ योग


यावेळेस हनुमान जयंतीला 'ध्रुव योग' आणि 'हस्त नक्षत्र' यांचा खास योग जुळून येत आहे.
ध्रुव योग दुपारी 2.20 वाजेपर्यंत असेल, जो अत्यंत शुभ मानला जातो.
याशिवाय संध्याकाळपर्यंत हस्त नक्षत्राचा प्रभाव राहील, ज्यामुळे पूजा-अर्चेचे महत्त्व अधिकच वाढणार आहे.


हनुमान जयंतीच्या दिवशी मनोभावे पूजा आणि व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. भीती, रोग आणि अडथळे नष्ट होऊन व्यक्तीला शक्ती, साहस आणि यशाचा आशीर्वाद मिळतो; असे म्हणतात.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''